A tree fell due to the storm on Saturday at Suburban Nak on Pune highway. esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : विजांच्या कडकडाटांसह पावसाची जोरदार हजेरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दिवसभर कमालीच्या उकाड्यानंतर सायंकाळी उशिरा शहर-तालुक्यासह इगतपुरी, सिन्नर, दिंडोरी, निफाड व चांदवड तालुक्यांच्या विविध भागांत विजांच्या कडकडाटांसह पावसाने शनिवारी (ता. ११) जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी वळिवाच्या पावसाने नाशिक शहरात हजेरी लावली होती. (Unseasonal Rainfall in district)

त्यानंतर शनिवारी दिवसभर कमालीचा उकाडा जाणवत होता. उकाड्यामुळे पावसाचा अंदाज होता. त्यानुसार सायंकाळी साडेआठच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटून रस्त्यावरील धूलिकण, झाडांचा पालापाचोळा उडत होता. यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागले.

दरम्यान. रात्री नऊच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरवात झाली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. पावसापासून बचावासाठी आडोसा शोधत पाऊस थांबण्याची अनेकांनी प्रतीक्षा केली; परंतु पाऊस न थांबल्याने अनेकांना भिजत पुढील प्रवास करावा लागला. शहरासह उपनगरीय भागांना पावसाने झोडपले.

...म्हणून पावसाची हजेरी

समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे, तसेच चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसाममधील हाफलाँग व सिल्चरपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंतच्या पातळीत पूर्व-पश्चिम पसरलेल्या हवेचा कमी दाबाचा आस तयार झाला आहे. त्यामुळे अवकाळी व गारपिटीचे वातावरण तयार झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. (latest marathi news)

पाऊस सुरू होताच बत्ती गुल

पाऊस सुरू होताच शहरातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरभर अंधार झाला होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून सातपूर औद्योगिक वसाहतीसह कामगार लोकवस्तीत पावसाने हजेरी लावत विजेचा कडकडामुळे वीज खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर मार्गावर नागापूर फाटा येथे वीजतारेवर झाड कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

झाड पडले, पत्रे उडाले

नाशिक रोड, जेल रोड , एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, हिंगणवेढे, चेहेडी, पळसे, शिंदे, देवळाली गाव, विहीतगाव परिसरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावणेनऊच्या सुमारास वादळी वाऱ्याची तीव्रता वाढल्यामुळे फांद्या तुटणे, पत्रे उडून जाणे आदी घटना घडल्या. खबरदारी म्हणून महावितरण वीज कंपनीने नाशिक रोड, जेल रोड आदी परिसरात वीजप्रवाह खंडित केला.

गेल्या काही दिवसांपासून अघोषित भारनियमनामुळे वीजपुरवठा खंडित होत होता. आता तीन दिवसांपासून पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा वेळी-अवेळी खंडित होत आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. आज रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक व्यावसायिकांनी दुकाने लवकर बंद करणे पसंत केले. वीज नसल्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

दिंडोरी-सिन्नरला वादळ

दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागात रात्री आठच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन जोरदार सरी बरसल्या. या वेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. तालुक्यातील मोहाडी, जानोरी, कोऱ्हाटे, खडक सुकेणे, अक्राळे, दिंडोरी आदी परिसरात पाऊस झाला. वारा अतिशय जोरदार असल्याने ग्रामस्थांनी घरातच राहणे पसंत केले.

सिन्नर तालुक्यातील वावी, पांगरी, पंचाळे, मीठ सागरे, नांदूर शिंगोटे या भागात वादळाचा जोर अधिक होता. देवपूर गावात पावसाने परिसरात थैमान घातल्याने गावातील ज्ञानेश्वर शांताराम गडाख यांच्या घरासमोर पाणी साचून घराबाहेर पडणे कठीण झाले.

यामुळे प्रशासनाने परिसरात पाणी जाण्यासाठी पाइप किंवा इतर सोय करावी, अशी मागणी गडाख परिवाराने केली. निफाड तालुक्यातील ओझरसह कसबे-सुकेणे, चांदोरी आणि नांदगाव शहरासह कासारी, साकोरा, बाणगाव परिसरात पावसाने हजेरी लावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT