Startups Funding esakal
नाशिक

Nashik Startups News : वर्षभरात स्‍टार्टअप्‍स्‌मध्ये 20 कोटींपर्यंत गुंतवणूक; पुढील 5 वर्षांत अडीचशे स्‍टार्टअप्‍सना आर्थिक बळ

Nashik News : बिझडेटअप टेक्‍नॉलॉजीज प्रा. लि. यांच्‍यामार्फत पुढील वर्षभरात नाशिकच्‍या स्‍टार्टअप्‍समध्ये वीस कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची तयारी आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Startups News : बेरोजगारीची समस्‍या कमी करायची असेल तर स्‍टार्टअप्‍सला आर्थिक पाठबळ देणे महत्त्‍वाचे आहे. या दृष्टीकोनातून बिझडेटअप टेक्‍नॉलॉजीज प्रा. लि. यांच्‍यामार्फत पुढील वर्षभरात नाशिकच्‍या स्‍टार्टअप्‍समध्ये वीस कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची तयारी आहे. तसेच पुढील पाच वर्षांमध्ये देशभरातील अडीचशे स्‍टार्टअप्‍समध्ये गुंतवणूक करत त्‍यांना आर्थिक बळ देणार असल्‍याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मित जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Nashik Up to 20 Crore Investment in Startups in year Financial marathi news)

याप्रसंगी संस्‍थापक जीत चंदन, पीआरडीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चंडालिया, विशाल धारणकर उपस्‍थित होते. जैन म्‍हणाले, की तंत्रज्ञानावर आधारित स्‍टार्टअप्‍ससोबत आरोग्‍य, इलेक्‍ट्रिक व्हेइकल अशा सर्वच क्षेत्रात गुंतवणुकीस प्राधान्‍य आहे. दर महिन्‍याला देशभरातून सुमारे अडीचशे स्‍टार्टअप्‍सकडून प्रस्‍ताव प्राप्त होत असून, छाननी प्रक्रिया राबवत त्‍यांच्‍यात गुंतवणूक केली जात असल्‍याचेही सांगितले.

धारणकर म्‍हणाले, की स्‍थानिक युवकांना नोकरीच्‍या चांगल्‍या संधी उपलब्‍ध करून देण्याच्‍या उद्देशाने पीडीआरएल कंपनी कार्य करत आहे. अनेक युवकांनी मोठ्या शहरातील संधी सोडून कंपनीशी जोडले गेले आहेत. भविष्यात आणखी व्‍यापक संधी निर्माण करण्याचा उद्देश आहे.

चंदन म्‍हणाले, की नाशिकमध्ये पीडीआरएल यांच्‍यासमवेत आणखी एका कंपनीत आत्तापर्यंत गुंतवणूक केलेली आहे. मोठ्या शहरांतील स्‍टार्टअप्‍सला सहजरित्‍या अर्थसहाय्य प्राप्त होते. परंतु तुलनेत छोट्या शहरांना अर्थसहाय्यता उपलब्‍ध करून देण्याच्‍या हेतूने आम्‍ही काम करत आहोत.   (latest marathi news)

ड्रोन क्षेत्रात व्‍यापक संधी : चंडालिया

चंडालिया म्‍हणाले, की कृषी, सुरक्षा यासह अन्‍य विविध क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर होऊ लागला आहे. भविष्यात हा वापर वाढत जाणार असून, या क्षेत्राची उलाढाल तीन लाख कोटींपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. ‘पीडीआरएल’ कंपनीतर्फे ड्रोन उडविण्यासाठी आवश्‍यक सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे.

पूर्वी त्‍यासाठी तायवान, चीनसारख्या देशांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु आता आमच्‍या कंपनीचा बाजारपेठेत साठ टक्क्‍यांपर्यंत वाटा आहे. तसेच ड्रोनसाठी लागणारे फ्लाइट कंट्रोलर उत्‍पादन करणारी आमची भारतातील एकमेव कंपनी आहे. यापुढेही कंपनी विस्‍तारत नेणार असल्‍याचे त्‍यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार! 'वर्षा' निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर

Most Expensive Player: ऋषभ पंतसह २ अय्यर्सना मिळालेत लिलावात विराटपेक्षा जास्त रक्कम; २० खेळाडूंची किंमत १० कोटींच्या वर

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Trending News: ओला स्कूटरमध्ये झाला बिघाड, दुरुस्तीसाठी लागले 90 हजार, तरुणाने हातोड्यानेच फोडली स्कूटर, पहा व्हिडिओ

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

SCROLL FOR NEXT