Dengue Infection esakal
नाशिक

Nashik Dengue Update: शहरात डेंगीचे दोन बळी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dengue Update : सिडको कामटवाडे परिसरातील एकाचा, तर पंचवटी विभागातील म्हसरूळमधील एका ६५ वर्षीय वृध्द महिलेचा डेंगीने मृत्यू झाला आहे.

यापूर्वी नाशिक रोड भागातील एका व्यक्तीचा डेंगीमुळे मृत्यू झाला होता. प्रयोगशाळेतील अहवालानुसार आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने डेंगीमुळे एकूण मृत झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. (Nashik Update 2 victims of dengue in city)

शहरात डेंगीने थैमान घातले असून, प्रत्येकी दोन ते तीन घरात डेंगी रुग्ण आढळून येत आहे. ऑक्टोबरमध्ये नाशिक रोड आनंदनगर भागातील एकाचा डेंगीने मृत्यू झाला. ऑक्टोबरमध्ये १९३ डेंगी बाधितांची नोंद झाली होती.

नोव्हेंबरमध्ये विक्रमी २७२ रुग्ण आढळले, तर बाधितांची संख्या १ हजाराच्या वर पोचली आहे. कामटवाडे भागातील एका व्यक्तीला डेंगी झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रुग्णाला काविळीचीही लक्षणे होती. उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. पंचवटीतील म्हसरूळ परिसरातील ६५ वर्षीय वृध्द महिलेसही डेंगीची लक्षणे आढळल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उपचार सुरू असताना वृध्द महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही रुग्णांचे रक्तनमुने जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर दोघांचाही मृत्यू डेंगीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले.

रुग्ण आढळलेल्या ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, जानेवारीत १७, फेब्रुवारीत २८, मार्चमध्ये २८, एप्रिल ८, मे ९, जूनमध्ये १३, जुलैत ३२, ऑगस्टमध्ये ४७, सप्टेंबर २६१, ऑक्टोबर १९३ तर नोव्हेंबर महिन्यात २७२ डेंगी रुग्ण आढळून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT