Hospital esakal
नाशिक

Nashik News: वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन! 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात होणार रूपांतर

Nashik News : सिन्नर तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. तीस खाटांच्या या नियोजित ग्रामीण रुग्णालयासाठी शासन स्तरावरून स्वतंत्र पदनिर्मिती देखील केली जाणार आहे. (Nashik Upgradation of primary health centre in Vavi converted into 30 bed rural hospital marathi news)

विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी वर्षभरापासून सिन्नर तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून तेथे ट्रॉमा युनिट सुरू करण्याची मागणी सातत्याने केली होती. या मागणीला मूर्त रूप आले असून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंबंधीचा निर्णय मंगळवारी घेतला.

राज्य सरकारच्या वतीने अपर सचिव कविता पिसे यांच्या सहीने आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून वावी प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मंजुरी दिली. वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण आवारात 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात येईल. त्यासाठी जागा अधिग्रहण, नवीन इमारत बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सिन्नर तालुक्यातील वावी हे गाव सिन्नर-शिर्डी महामार्गावर वसले आहे. समृद्धी महामार्ग, नियोजित सुरत-चेन्नई एक्सप्रेस वे, ओझर एअरपोर्ट ते शिर्डी एअरपोर्ट मार्गावर अपघात घडल्यास, तसेच परिसरातील सुमारे चाळीस गावांमधील सर्वसामान्य लोकांना आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्रॉमा युनिट सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांची होती. (Latest Marathi News)

यासंदर्भात राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसह आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडे आमदार तांबे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मंगळवारी यश आले. विशेष बाब म्हणून शासनाकडून वावी आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून तेथे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात येणार असल्याने ट्रॉमा युनिट सुरू होण्याची पहिली पायरी यशस्वी ठरली आहे.

"वावी परिसरातील नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू केले होते. दळणवळण सुविधा विकसित होत असल्याने या भागात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर योग्य उपचार मिळणे आवश्यक होते. ही गरज ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा युनिटच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे."

- संतोष जोशी (उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी सिन्नर)

"सिन्नर तालुक्यातील वावी आणि संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथे विशेष बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करून तेथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतला. या दोन्ही ठिकाणची ग्रामीण रुग्णालये अत्याधुनिक पद्धतीची असतील. ट्रॉमा युनिटच्या सर्व सुविधा तेथे एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्या जातील."

- सत्यजित तांबे (विधान परिषद सदस्य)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT