Nashik News : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राजर्षी शाहू वृद्ध कलावंत व साहित्यिक मानधन योजना उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत वृद्ध कलावंत व साहित्यिक यांना दर महिला अ, ब व क श्रेणीसाठी मानधन दिले जाते. योजनेच्या लाभासाठी येत्या २० मार्चपर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविली जात होती. (Nashik Upto 20 terms for senior artists literary gratuity scheme marathi news)
सद्यःस्थितीत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे या योजनेअंतर्गत असलेल्या लाभार्थींची संपूर्ण माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे लाभार्थींनी लाभासाठी आवश्यक असलेली माहिती पंचायत समितीत नियुक्त केलेल्या समन्वय अधिकाऱ्यांकडे २० मार्चपर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. (latest marathi news)
योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून शंभर कलाकार व साहित्यिकांची निवड जिल्हा स्तरावरील निवड समितीमार्फत करण्यात येते. लाभार्थींची वैयक्तिक माहिती यात आधार कार्ड, संपर्क क्रमांक, कलेचा प्रकार तसेच वृद्ध कलावंतांनी, कलाकार यांच्या वारसांचे नाव, पत्ता, मानधन कधीपासून मिळते याचा तपशील, कलाकार/ वारसदार यांचे वय, आधार क्रमांक, संपर्क क्रमांक, बँक खाते तपशील आदी माहिती कलाकार, वारसदार यांच्या एकत्र छायाचित्रासह विहित मुदतीत सादर करावयाची आहे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.