Areas cleared by providing sugarcane for animals esakal
नाशिक

Nashik News : उभ्या उसाचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी; हंगामापूर्वीच ऊसतोडणी जोरात, 5 हजार प्रतिगुंठा दर

Nashik News : कारखाने सुरु झाल्यानंतर उसाला जेवढा भाव मिळत नाही तेवढा भाव सध्या जनावरांसाठी उस दिल्यावर मिळत असल्याने उसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे.

माणिक देसाई

निफाड : जून संपायला आला तरी, तापमान कमी होत नसल्याने आणि पाणीटंचाईची तीव्रता कायम असल्याने ग्रामीण भागात चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांचा निफाडच्या गोदाकाठचा ऊस खरेदीला राबता वाढला आहे. (Use of sugarcane for animal fodder)

कारखाने सुरु झाल्यानंतर उसाला जेवढा भाव मिळत नाही तेवढा भाव सध्या जनावरांसाठी उस दिल्यावर मिळत असल्याने उसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात ऊसतोडणी जोरात सुरू आहे. यामुळे यंदा निफाडच्या गाळपाचा ऊस चाऱ्यासाठी जात असल्याचे चित्र आहे.

हंगामापूर्वीच तोडणी जोरात

निफाडच्या गोदाकाठ पट्यातील उसाला मोठी मागणी असून चाऱ्यासाठी बांडीसह ऊस पाच हजार रुपये प्रतिगुंठा दराने तोडून नेता जात आहे. ज्यांना वजनावर हवा आहे, त्यांच्यासाठी ४ हजार रुपयाप्रमाणे भाव दिला जात आहे. एकुणच उसाच्या हंगामात जेवढा भाव मिळत नाही तो भाव सध्याच कमी दिवसांत मिळत असल्याने जास्त पैसे मिळून शेतात दुसरे पीक घेता येत असल्याने या ऊस तोडीतून जसा शेतकऱ्यांना फायदा होतो.

तसाच पशुपालकांनादेखील होत आहे. गोदाकाठ परिसरात कारखान्याच्या हंगामापूर्वीच ऊस तोडणीचा हंगाम बहरात आला आहे. शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसायाला पसंती देणाऱ्या शेतकऱ्यांचा चाऱ्यासाठी राबता आहे. (latest marathi news)

गावोगावचे चित्र

यंदा मार्चपासूनच पाणीटंचाईमुळे अनेक पशुपालक जनावरांसह गोदाकाठ परिसरात डेरेदाखल झाले आहेत. साहजिकच तालुक्यातील सापखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, म्हाळसाकोरे, खानगाव थडी, नांदूर मध्यमेश्वर, शिवले, जळगाव, कोठुरे, काथरगाव, निफाड, सारोळे थडी, खेडतेष्टुंगे, भेडाळी, तारखेडते, तामसवाडी, करंजी खुर्द गावांच्या शिवारात हे पशुपालक वास्तव्यास दिसतात. मात्र ज्यांना शक्य नाही अशा पशूपालकांकडून चारा खरेदीला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळेच हंगामापूर्वीच तालुक्यातील परिसरातील ऊस तोडून नेताना दिसत आहेत.

"साखर कारखाना चालू होण्यासाठी चार महिन्यांचा अवधी आहे तोपर्यंत ऊस सांभाळूनदेखील जास्तीत जास्त ३ हजार रुपये टनाचा भाव मिळेल. मात्र तोच ऊस आता चाऱ्यासाठी दिला, तर पैसे जास्त मिळून जमीनदेखील चार महिने अगोदर मोकळी होईल.साहजिकच या शेतात मका, सोयाबीन, कांदा, अशी चार महिन्यांची पिके घेता येत असल्याने दुहेरी फायदा होतो." - किरण सानप शिवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT