Members and aspirants present during the ongoing scrutiny process under Naik Shikshan Sanstha election process on Wednesday. esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election : 3 पॅनल तयार; चौथ्याची चाचपणी! छाननीत 9 अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नाराणराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्‍या पंचवार्षिक निवडणुकीच्‍या प्रक्रियेत गुरुवार (ता. ११)पासून माघारीला सुरवात होणार आहे. शनिवार (ता. १३)पर्यंत माघारीची मुदत असून, तत्‍पूर्वी बुधवारी (ता. १०) झालेल्‍या छाननी प्रक्रियेत नऊ अर्ज बाद ठरले. दुसरीकडे इच्‍छुकांकडून पॅनलनिर्मिती अंतिम टप्प्‍यात आहे. (V. N. Naik Institution Election)

तीन पॅनलची उभारणी जवळजवळ पूर्ण झाली असून, चौथ्यासाठी चाचपणी सुरू असल्‍याची खात्रीलायक समजते. गंगापूर रोडवरील संस्‍थेच्‍या शैक्षणिक संकुलात बुधवारी (ता. १०) उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. अर्ज दाखल करताना उमेदवारांनी संबंधित तालुक्‍यातीलच सूचक व अनुमोदक असणे आवश्‍यक असताना या तांत्रिक बाबींमुळे काही उमेदवारांचे अर्ज बाद ठरले.

काहींनी सभासद क्रमांक चुकीचा नमूद केल्‍याने तसेच अन्‍य विविध कारणांनी एकूण नऊ अर्ज नामंजूर झाले. तत्‍पूर्वी निर्धारित प्रक्रियेनुसार त्रुटींची पूर्तता करण्यासंदर्भात निवडणूक मंडळाने उद्‌घोषणा केली. दिलेल्‍या वेळेत त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. ही प्रक्रिया निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. जालिंदर ताडगे, सदस्‍य ॲड. संतोष दरगोडे, एल. एम. ढाकणे यांच्‍या उपस्‍थितीत झाली.

एकीकडे प्रशासकीय प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे पॅनल उभारणीची तयारी अंतिम टप्प्‍यात पोचली आहे. त्‍यामुळे तीन पॅनलची निर्मिती जवळजवळ निश्‍चित मानली जात असून, चौथ्या पॅनलच्या उभारणीचेही प्रयत्‍न सुरू असून, त्‍याला यश येण्याची दाट शक्‍यता आहे. (latest marathi news)

असे आहेत पॅनलचे गणित...

ॲड. तानाजी जायभावे अध्यक्ष, हेमंत धात्रक सरचिटणीस, ॲड. पी. आर. गिते उपाध्यक्ष, तर सहचिटणीस पदासाठी दिगंबर गिते असे एक पॅनल तयार होत असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, तर कोंडाजीमामा आव्‍हाड अध्यक्ष, माजी आमदार बाळासाहेब सानप सरचिटणीस, जयंत सानप सहचिटणीस असे दुसरे पॅनल उभे राहात आहे.

याशिवाय विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे अध्यक्षपदासाठी उमेदवारी करत असून, त्‍यांच्‍यासोबत शिवाजी मानकर व सुदाम सांगळे मिळून पॅनलनिर्मिती करत आहेत. याशिवाय संस्‍थेच्‍या वार्षिक सभा गाजविणारे मनोज बुरकुले व अभिजित दिघोळे यांच्‍याकडूनही चौथ्या पॅनलच्‍या उभारणीसाठी चाचपणी केली जात असल्‍याचे समजते.

यांचे अर्ज झाले बाद

छाननीत नऊ अर्ज बाद झाले असून, यामध्ये सहचिटणीसपदाचे दोन, विश्वस्तपदासाठी एक, सिन्नर तालुका तीन, निफाड दोन व नांदगावचा एक अर्ज बाद ठरला आहे. सहचिटणीस पदासाठी बबनराव सानप, राजेंद्र सोनवणे यांचे अर्ज बाद झाले. विश्‍वस्‍त पदासाठीचा साहेबराव कुटे यांचा, सिन्नर सदस्‍यपदासाठी मोहन काकड, नामदेव काकड यांच्‍यासह राजाराम वाघ यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. निफाड तालुका साहेबराव कुटे आणि बाळकृष्ण नागरे यांचे नांदगाव सदस्‍यपदासाठीचा रविकिरण डोमाडे यांचा अर्ज त्रुटींमुळे नामंजूर ठरविला आहे.

आधारकार्ड ग्राह्य धरा...

छाननी प्रक्रियेनिमित्त इच्‍छुक, सभासदांनी निवडणूक मंडळाशी निवडणुकीसंदर्भात विविध मुद्यांवर चर्चा केली. बहुतांश सभासदांना संस्‍थेचे ओळखपत्र मिळालेले नाही. त्‍यामुळे आधारकार्ड, पॅनकार्डसह शासकीय ओळखपत्र मतदानावेळी ग्राह्य धरावे, अशी मागणी केली. तसेच मृत सभासदांच्‍या नावे मतदान होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्‍या सूचनादेखील केल्‍या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT