Fake voting, confusion caused by ex-MLA's son scuffle esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election : संस्थेच्या आवारात तणावाचे वातावरण; नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

V. N. Naik Institution Election : मतदान सुरू असताना अखेरच्या टप्प्यात निफाड तालुका बूथवर बनावट मतदान सुरू असल्याची तक्रार आली अन त्यावरून एकच गोंधळ उडाला.

सकाळ वृत्तसेवा

V. N. Naik Institution Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. २७) दिवसभर सुरळीत मतदान सुरू असताना अखेरच्या टप्प्यात निफाड तालुका बूथवर बनावट मतदान सुरू असल्याची तक्रार आली अन त्यावरून एकच गोंधळ उडाला. या गोंधळात पॅनल समर्थक एकमेकांसमोर आल्याने पोलिसांची धावपळ झाली. या गोंधळात पोलिसांकडून सर्वांना बाहेर काढले जात असतानाच संस्थेच्या प्रवेशद्वारावर माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप व पोलिसांत बाचाबाची झाली. (Election atmosphere of tension in premises of institutional leaders accusing each other )

यात पोलिसांकडून मच्छिंद्र यास मारहाण झाल्याने समर्थक संतप्त झाले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी पोलिसांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांना पाचारण करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. या वेळी पॅनल नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. संस्थेच्या आवारात मतदान सुरू असताना सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास निफाड तालुका बूथवर एकाकडून बनावट मतदान सुरू असल्याचे विरोधातील मतदान प्रतिनिधींच्या निदर्शनास आले.

त्या वेळी या मतदान प्रतिनिधींनी आरडा-ओरड करीत बनावट मतदान करणाऱ्यास रंगेहाथ पकडले. त्यानंतर मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली. सर्वत्र पळापळ सुरू झाली. यात बनावट मतदान करणाऱ्यास विरोधी पॅनलच्या समर्थकांनी मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळी समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर, विरोधी पॅनलच्या उमेदवारांसह समर्थकांनी झालेल्या मतदानावर आक्षेप घेतला.

याबाबत परिवर्तन पॅनलचे उमेदवार बाळासाहेब सानप, कोंडाजीमामा आव्हाड यांनी निवडणूक मंडळाकडे आक्षेप नोंदविला. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. जालिंदर ताडगे यांनी सर्व प्रमुख पॅनल नेत्यांना बोलावत बैठक घेतली. तब्बल दोन ते तीन तास या विषयांवर बंद खोलीत चर्चा झाली. बनावट मतदान करणाऱ्यास बाहेर आणत असताना झालेल्या गोंधळामुळे पोलिस तत्काळ आवारातील उपस्थितांना बाहेर काढत होते. त्या वेळी प्रवेशद्वारावर माजी आमदार सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांनाही पोलिसांनी बाहेर काढले. (latest marathi news)

पोलिस व मच्छिंद्र यांच्यात तू-तू-मैं-मैं झाली. यात धक्काबुकी होऊन पोलिसांकडून मच्छिंद्र यास मारहाण झाली. त्या वेळी समर्थक एकदम धावून गेल्याने मोठा गोंधळ होऊन पळापळी सुरू झाली. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लागलीच हस्तक्षेप केल्याने या प्रकरणावर पडदा पडला. मात्र, बनावट मतदान प्रकार तक्रारींवर संस्थेच्या आवारात समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांना पाचारण करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

''निवडणुकीत गैरप्रकार घडला असल्याची तोंडी तक्रार परिवर्तन पॅनलचे उमेदवार बाळासाहेब सानप यांनी केली आहे. या गैरप्रकाराबाबत सर्व पॅनलच्या प्रमुखांकडून घडलेल्या प्रकाराचे व्हिडिओ स्टेटमेंट घेतलेले आहेत. तसेच, संबंधित बूथवरील कर्मचारी यांच्याकडूनही स्टेटमेंट घेतले गेले. याबाबत आरोप करणाऱ्या पॅनलच्या प्रमुखांना लेखी तक्रार करण्यास सांगितले आहे. त्यांची लेखी तक्रार आल्यास त्यानुसार सीसीटीव्ही तपासून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल. रविवारी (ता. २८) ठरल्याप्रमाणे मतमोजणीची प्रक्रिया होईल.''- ॲड. जालिंदर ताडगे, अध्यक्ष, निवडणूक निर्णय मंडळ

''संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयातील १४ क्रमांकाच्या बूथवर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचे नातलग सरचिटणीस पदासाठीच्या काही बनावट मतपत्रिका मतपेटीत टाकत असल्याची बाब आमच्या पॅनलच्या मतदान प्रतिनिधींच्या लक्षात आली. हे कृत्य करणाऱ्या दोघांपैकी एकास पोलिसांच्या हवाली केले आहे. दुसरी व्यक्ती गायब झाली. पोलिसांनी त्याला पकडून कारवाई करावी, तसेच आम्ही निवडणूक निर्णय मंडळाकडे तक्रार देत आहोत. त्यांनी सत्यता तपासून दोषींवर कारवाई करावी.''- कोंडाजीमामा आव्हाड, नेते, परिवर्तन पॅनल

''मतदानाची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात असताना झालेल्या बनावट मतदानाच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांवर केलेला आरोप हा अत्यंत चुकीचा आहे. एका सामाजिक शिक्षण संस्थेत अशा प्रकारचा आरोप करणे हे अयोग्य आहे, याचा मी निषेध करतो. संबंधित कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून तपासणी होणार असून, त्यातून सत्यता समोर येईलच.''- हेमंत धात्रक, नेते, प्रगती पॅनल

''शैक्षणिक संस्थेच्या निडणुकीत असे प्रकार होणे हे चुकीचे आहे. मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडलेली असताना अखेरच्या काही मिनिटांत बनावट मतदान झाल्याने संपूर्ण प्रक्रियेलाच गालबोट लागले गेले. ही घटना अपेक्षित नव्हती. हा प्रकार झाल्यावर सर्वांनी संयमाची भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र, तसे काही झाले नाही. हा पायंडा चुकीचा आहे.''- पंढरीनाथ थोरे, नेते, क्रांतिवीर विकास पॅनल

''ही सामाजिक शिक्षण संस्था असून, यात असे प्रकार होणे चुकीचे आहे. दुपारी साडेचारपर्यंत मतदान सुरळीत होते. मात्र, बनावट ब्लँक मतपत्रिका मतदान केंद्राबाहेर आणल्यावर संबंधितांना आर्थिक देवाण-घेवाण होऊन बनावट मतदान होत असल्याने हा गोंधळ झाला. या ठिकाणी वर्षानुवर्षी तेच-तेच पदाधिकारी निवडून येत असून, कर्मचारीही त्यांनाच मदत करतात. यामुळे निवडणूक निर्णय मंडळ बदनाम होत आहे.''- मनोज बुरकुले, नेते, नवऊर्जा पॅनल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT