V. N. Naik Institution Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या प्रगती पॅनलने एकूण २९ पैकी २३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले. परिवर्तन पॅनलने अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार जागांवर विजय प्राप्त केला आहे. तब्बल १३ तास सुरू असलेल्या मतमोजणीचा अंतिम निकाल रात्री एकला निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. जालिंदर ताडगे यांनी जाहीर केला. (parivartan panel has won four seats including chairman vice chairman )
विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिवीर विकास पॅनलला आणि नवऊर्जा पॅनलाल एकही जागा मिळविता आली नाही. संस्थेच्या २९ जागांसाठी रविवारी (ता. २८) मतमोजणी झाली. सुरवातीपासूनच प्रगती पॅनल व परिवर्तन पॅनलमध्ये रंगतदार लढत असल्याचे दिसून आले. नाशिक शहर-तालुका गटातून प्रगती पॅनलने पहिले खाते उघडले. या गटातील प्रगतीचे तीन, तर परिवर्तनचा एक उमेदवार विजयी झाला.
प्रगती पॅनलची विजयाची आघाडी ही अखेरपर्यंत कायम राहिली. नाशिक शहर-तालुका, निफाड, दिंडोरी व विश्वस्त या प्रत्येक गटात परिवर्तन पॅनलचे एक-एक उमेदवार विजयी झाले. संचालकानंतर, रात्री दहाला प्रमुख चार पदाधिकाऱ्यांच्या मतमोजणीला सुरवात झाली. यात सहचिटणीसपदाच्या मतमोजणीत ‘प्रगती’चे दिगंबर गिते यांना दोन हजार ९१२ मते मिळाल्याने ते विजयी झाले.
प्रतिस्पर्धी ‘परिवर्तन’चे उमेदवार अॅड. जयंत सानप यांना दोन हजार १२९ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या मतमोजणीत सुरवातीपासूनच ‘परिवर्तन’चे उमेदवार उदय घुगे पुढे होते. त्यांना एकूण दोन हजार ४४६ मते मिळाली. त्यांनी ‘प्रगती’चे उमेदवार तथा विद्यमान उपाध्यक्ष अॅड. पी. आर. गिते यांचा ३८३ मतांनी पराभव केला. गिते यांना दोन हजार ६३ मते मिळाली. अखेरच्या टप्प्यात अध्यक्ष व सरचिटणीस पदाची मतमोजणी झाली. (latest marathi news)
दोन्ही पदासांठी उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर सुरू होती. यात, सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी दोन हजार ५३२ मते घेत विजयी झाले. त्यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा २४८ मतांनी पराभव केला. सानप यांना दोन हजार २८४, तर क्रांतिवीर विकास पॅनलचे शिवाजी मानकर यांना एक हजार ३०८ मते मिळाली.
अध्यक्षपदाच्या मतमोजणीत कोंडाजीमामा आव्हाड यांनी बाजी मारली. त्यांना दोन हजार २३२ मते मिळाली. त्यांनी १२८ मतांनी अॅड. तानाजी जायभावे यांचा पराभव केला. माजी अध्यक्ष थोरे यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अॅड. ताडगे, सहाय्यक अॅड. संतोष दरगोडे, अॅड. अमोल घुगे, अॅड. एल. एम. ढाकणे यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
१) अध्यक्ष : कोंडाजीमामा आव्हाड (२२३२), अॅड. तानाजी जायभावे (२१०४), पंढरीनाथ थोरे ( १९४९), मनोज बुरकुल (४३३)
२) उपाध्यक्ष : उदय घुगे (२४४६), अॅड. पी. आर. गिते ((२०४६), कमलेश बोडके (१७३२), जयसिंग सांगळे (४६०)
३) सरचिटणीस : हेमंत धात्रक (२५३२), बाळासाहेब सानप (२२८४), शिवाजी मानकर (१३०८), अभिजित दिघोळे (५५१)
४) सहचिटणीस : दिगंबर गिते (२९१२), अॅड. जयंत सानप (२१२९), एकनाथ दिघोळे (१४६८), संदीप फड (२८१)
विश्वस्त : (६ जागा) ः दामोदर मानकर (२५५३), अशोक नागरे (२१०६), बबनराव सानप (२०९९), नामदेव काकड (२०६८), नारायण काकड (२०४९), लक्ष्मणराव जायभावे (२२३५), बाळासाहेब चकोर (२०४३), रमेशचंद्र घुगे (२०२७), नारायण पालवे (१८४५), धर्माजी बोडके (१९६०), बाळासाहेब वाघ (१९८२), अॅड. रामनाथ सानप (१९२९), सुभाष कराड (१८४८)
नाशिक तालुका शहर (४ जागा) ः प्रकाश घुगे (२५४१), प्रल्हाद काकड (२४३९), बाळासाहेब धात्रक (२३२५), गोकुळ काकड (२२२२), माणिक सोनवणे (२००४), बबन कांगणे (२०६७), भाऊसाहेब गिते (१९१२), प्रकाश नागरे (२०२९), विलास आव्हाड (१६०८), प्रशांत आव्हाड (१४२९)
सिन्नर (३ जागा) ः जयंत आव्हाड (२४८१), समाधान गायकवाड (२४७३), हेमंत नाईक (२३३९), किरण गिते (१९८०), भाऊसांहबे सांगळे (१९५२), काशीनाथ सानप (१९२०)
निफाड (३ जागा) ः पुंजाहरी काळे (२५०४), बंडू दराडे (२३५३), उद्धव कुटे (२३३६), सोमनाथ गंभीरे (२०९७), रामनाथ नागरे (२२०५), विश्वास (बासू) सानप (२०२१).
दिंडोरी (३ जागा) ः शरद बोडके (२५९३), राजेश दरगोडे (२३५०), सुभाष आव्हाड (२३०४), संजय वाघ (२०६१), भगवंत चकोर (२१२३), बापू दरगोडे (१८५८)
येवला (२ जागा) ः रमेश नामदेव वाघ (२३३७), संपत वाघ (२३२३), महेश आव्हाड (२१०९), रमेश वाघ (२०४७), रामभाऊ केदार (१६६९), वाल्मीक बोडके (१४५०)
नांदगाव (२ जागा) ः त्र्यंबक डोंगरे (२३५३), किशोर लहाने (२३४३), प्रकाश उगले (२०९१), निलंकठ सानप (२०७१)
महिला राखीव (२ जागा) ः रेखा रामप्रसाद कातकडे (२५५१), नंदा बंडू भाबड (२४१६), रंजना विलास सांगळे ((१९०४), म्हाळसाबाई सोनवणे (१९०१).
धात्रकांची हॅट्ट्रिक, आव्हाडांचे पुनरागम
सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रिक साधली आहे. २०१४, २०१९ मध्ये ते विजयी झाले होते. यंदाही त्यांनी बाजी मारली आहे. अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड सलग २५ वर्षांपासून संस्थेवर निवडून आले आहेत. परंतु, २०१९ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. यंदा सभासदांनी त्यांना पुन्हा कौल दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.