Nashik Police : शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहन ताफ्यात नव्याने वाहने दाखल झाली आहेत. गस्ती पथके, ‘डायल ११२’, गुन्हे शाखांच्या चाकांना यामुळे गती मिळाली असली तरी, वाहनचालकांची कमतरता मात्र भेडसावते आहे. पोलिस ठाणे, विविध शाखांना वाहने मिळाली मात्र चालकच नसल्याने अंमलदारावर सारथ्य करण्याची वेळ आली आहे. गतवर्षी गस्तीवर संशयितांचा पाठलाग करताना पोलिस वाहने नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिस ताफ्यातील जुनाट वाहनांची चर्चा ऐरणीवर आली होती. (Various branches have got vehicles but lack of drivers in police vehicle fleet )
परिणामी, आयुक्तालयाने नवीन वाहनांसाठी पाठपुरावा केला. त्यानुसार काही महिन्यांमध्ये सातत्याने आयुक्तालयास नव्याने वाहने मिळाली आहेत, तर गेल्या आठवड्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनही वाहने पोलिस ताफ्यात सामील झाली आहेत. शहर आयुक्तालयात जुनी आणि नवीन अशी ४१९ वाहने आहेत. यात २५५ कार व मोठ्या वाहनांचा समावेश आहे.
पोलिस आयुक्तालयाची १९९० मध्ये निर्मिती झाली, त्या वेळी मोटार परिवहन विभागात वाहन चालक पदावर एक सहायक उपनिरीक्षक, २९ हवालदार आणि ११५ शिपाई पदे असे १४५ पदे मंजूर आहेत. मात्र, १०९ अंमलदार सध्या कार्यरत आहेत. तसेच, आयुक्तालयामध्ये आंतरजिल्हा बदली करून हजर झालेल्या १८३ अंमलदारांना बंधपत्रानुसार चालक पदावर नेमण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्तालयाच्या वाहन विभागात आजमितीस २९२ वाहन चालक सेवेत आहेत.
अंमलदारांवर सारथ्याचा भार
दुसरीकडे पोलिस आयुक्तालयाकडे वाहनांची संख्या ४१९ असून, त्या तुलनेत वाहनचालकांचे मनुष्यबळ नसल्याने आयुक्तालयास समस्या भेडसावत आहे. १९९० च्या तुलनेत आजमितीस आयुक्तालय हद्दीमध्ये पोलिस ठाण्यांची संख्या वाढली आहे. विविध शाखा सुरू झाल्या आहेत. शहरातील हद्दीमध्ये गस्तीचे प्रमाण वाढले आहे. तसेच, नवनवीन उपक्रमांतर्गत कामकाजाचे स्वरूपही बदलले आहे. त्याअंतर्गतच ‘डायल ११२’, डीबी मोबाईल, पीटर मोबाईल, शहर वाहतूक शाखा, गस्ती पथके, बीटमार्शल, व्हीआयपी दौरे यासाठी अद्ययावत वाहने लागतात. (latest marathi news)
त्यानुसार नुकताच अद्ययावत वाहन ताफा समाविष्टही झाला आहे. मात्र वाहने आणि चालक यात असमतोल कायम आहे. नव्याने वाहने येताच त्यांचे वाटप पोलिस ठाणे, विविध शाखांना करण्यात आले आहे. परंतु पोलिस ठाणे, विविध शाखांकडे पुरेशा प्रमाणात वाहनचालकांची उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांशी वेळा पोलिस ठाण्यातील अंमलदार, शिपाई वा कधी कधी तर उपनिरीक्षकांनाच वाहनांचे सारथ्य करावे लागते आहे.
पोलिसांचे वाहने
कार - १८९
दुचाकी - १३९
मोपेड - ७३
मिनी बस - ३४
कैदी पार्टी वाहन - १६
साध्या बस - २
ट्रक, टँकर - ३
विशेष वाहने - ११
''चालकांची कमतरता भरून काढण्यासाठी आंतरजिल्हा बदलीवर आलेल्यांना चालक म्हणून तात्पुरती नेमणूक करीत असतो. भविष्यात मंजूर पदाची संख्या वाढली तर त्यानुसार भरती प्रक्रिया राबविली जाईल.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, मुख्यालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.