Vegetable seller esakal
नाशिक

Nashik Vegetable Rates : पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांना फटका! आवक घटली; खराब मालाला प्रतवारीनुसार बाजारभाव

Latest Nashik News : सद्यःस्थितीत पालेभाज्या आवक घटली असली तरी चांगल्या प्रतिच्या पालेभाज्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे. मात्र, पावसाने खराब झालेल्या मालाला प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली असून, ती २० ते २५ टक्क्यांवर आलेली आहे. पालेभाज्या नाशवंत, त्यात पावसाचा फटका बसतो. सद्यःस्थितीत पालेभाज्या आवक घटली असली तरी चांगल्या प्रतिच्या पालेभाज्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे. मात्र, पावसाने खराब झालेल्या मालाला प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत आहे. (vegetables hit by rain import decreased)

नाशिक बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो आणि काही प्रमाणात हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करत असतात. मात्र, तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने त्याचा फटका पालेभाज्यांना बसला असून मालाच्या प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत आहे.

बाजार समितीत शुक्रवार (ता.२७ ) झालेल्या लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीर किमान १५ ते सर्वाधिक ११० रुपये जुडी, चायना कोथिंबीर किमान १० ते ७९ रुपये जुडी, मेथी १० ते ४१ रुपये जुडी, शेपू १० ते ३२ रुपये जुडी, कांदापात २० ते ४५ रुपये जुडीला भाव मिळाला आहे. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी,शेपू, कांदापात यांची जुडी छोटी करून डबल बाजार भावाने विक्री होत आहेत. (latest marathi news)

फळभाज्यांचे बाजारभाव"

लिलावात काकडी ७ ते १५ रुपये किलो, दुधी भोपळा १० ते १८ रुपये प्रतिकिलो, गिलके १२ ते २० रुपये किलो, कारले ५ ते १५ रुपये प्रतिकिलो, दोडका १५ ते २५ रुपये प्रतिकिलो, शिमला मिरची ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो, हिरवी मिरची ३० ते २५ रुपये प्रतिकिलो रुपये, वाटाणा १२० ते १२५ रुपये प्रतिकिलो, वाल ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो, गवार १५ ते २९ रुपये प्रतिकिलो, घेवडा २० ते ३० रुपये प्रतिकिलो, गाजर २० ते २५ रुपये प्रतिकिलो, वांगी १० ते १७ रुपये प्रतिकिलो, भेंडी ५ ते १५ रुपये प्रतिकिलो, टॉमेटो १५ ते ४२ रुपये ५० पैसे प्रतिकिलो, असे दर मिळाला आहे. किरकोळ विक्रेत्यांकडे हेच दर प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये वाढीव असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT