Bike Theft esakal
नाशिक

Nashik Bike Theft : शहरात वाहनचोऱ्या सुसाट; रिक्षासह 4 दुचाक्यांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात सातत्याने दुचाक्या चोरीचे सत्र सुरूच आहे. रिक्षासह चार दुचाक्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजय जयवंतराव चव्हाण (रा. दत्तनगर, पेठरोड) यांची २० हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ बीएच ९४७४) शनिवारी (ता ४) रात्री आठच्या सुमारास पेठरोडवरील शनि मंदिराच्या पाठीमागून चोरीला गेली आहे. (Nashik Bike Theft)

याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश अर्जून शिंदे (रा. घनकर लेन, अशोकस्तंभ) यांची ३० हजाराची दुचाकी (एमएच १५ एचएस ४८०७) २ तारखेला मध्यरात्री गणेशवाडीतील आयुर्वेदिक दवाखान्याच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरिफ इस्माईल पठाण (रा. कथाडा, जुने नाशिक) यांची ९० हजारांची प्रवासी रिक्षा (एमएच १५ एफयु १०२७) गेल्या २ तारखेला डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयाच्या गेटजवळ पार्क केलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घनशाम बाळू डंबाळे (रा. त्रिमूर्ती चौक, सिडको) यांची ५० हजारांची दुचाकी (एमएच १५ एचझेड १६७२) २२ एप्रिलच्या मध्यरात्री उपनगर येथील अभिष नगर सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन मधुकर गांगुर्डे (रा. दसकगाव) यांची २५ हजारांची दुचाकी (एमएच १५ एफएक्स ७८५९) ३० एप्रिल रोजी मध्यरात्री रेल्वेस्टेशनसमोर असलेल्या बंद पेट्रोल पंपाच्या आवारातून चोरीला गेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT