Vehicles move despite signal being red Violation of rules  esakal
नाशिक

Nashik City Transport : सिग्नल ‘रेड’ असूनही वाहने सुसाट; पंचवटी परिसरात नियमांना बगल

Nashik News : नाशिक शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. ही समस्या सुटावी व रहदारी सुरळीत व्हावी याकरिता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

योगेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. ही समस्या सुटावी व रहदारी सुरळीत व्हावी याकरिता सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, वाहनचालक वाहतूक नियमांना बगल देत सिग्नल तोडताना दिसून येत असून ती घातक व जीवघेणी आहे. यासाठी वाहतुकीची नियम पाळतच मार्गक्रमण केले पाहिजे, हे प्रकर्षाने जाणवत आहे. (Vehicles move despite signal being red Violation of rules )

नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत आहे. यात पंचवटी विभागात नागरी लोकवस्ती वाढत चालली आहे. दिंडोरी रोड, पेठ रोड, मुंबई आग्रा महामार्ग, छत्रपती संभाजी महाराजनगर मार्ग या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व रहदारी सुरळीत चालावी यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.

मात्र पंचवटीतील दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंप, तारवालानगर, पेठ रोडवरील हॉटेल राऊ चौफुली , शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड चौफुली, पेठा फाटा, मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसेल सिग्नल, मखमलाबाद नाका, पंचवटीत जुना आडगाव नाका (काट्या मारुती पोलिस चौकी चौफुली), मुंबई- आग्रा महामार्ग ओमनगर चौफुली सिग्नल, नवीन आडगाव नाका, चौफुली, छत्रपती संभाजी महाराज नगर रोडवर कैलासनगर ( हॉटेल मिरची चौफुली).

नांदूर नाका या ठिकाणी सिग्नल यंत्रणा चालू असताना वाहनचालक बेफिकिरी करताना दिसून येत आहे. वाहनचालक जीव धोक्यात घालून सिग्नल तोडून मार्गक्रमण करीत आहेत. यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात दुचाकी, तीनचाकीचे प्रमाण अधिक आहे. तसेच जोपर्यंत सिग्नल ग्रीन होत नाही, तोच वाहने पुढे पुढे जाण्याचे चित्र नेहमीच आढळून येते. (latest marathi news)

मिरची चौकात बेशिस्त जैसे थे

छत्रपती संभाजी महाराजनगर रोडवरील मिरची चौफुलीवरील सिग्नलवर ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे खासगी प्रवासी बसने आयशर ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बारा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र, या जीवघेण्या दुर्घटनेनंतर येथील सिग्नल सुरू असताना बेशिस्त वाहतूक जैसे थे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

सिग्नल बंद असल्यानंतर वाहतूक अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू राहते. अवजड वाहनांच्या समोरून छोटी वाहने घाईने पुढे नेण्याचा प्रयत्न अनेकांकडून होत राहतो. वाहतूक कोंडी होणारे छोटे- मोठे अपघात टाळण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी अवजड वाहन, बस स्कूल चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT