सिन्नर : केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयच्या अंतर्गत येणाऱ्या सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाशी संबंधित विविध मागण्यांसाठी बारा दिवसांपासून धरणे आंदोलन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख दीपक वेलजाळी यांनी शुक्रवारपासून (ता.४) अन्नत्याग आंदोलन सुरू केले. महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून आपल्या मागण्यासंदर्भात योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप श्री. वेलजाळी यांनी केला आहे. (Veljali food sacrifice agitation)
सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प टप्प्यातील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढावीत, जळालेल्या झाडांसंदर्भात ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसह महामार्ग प्रकल्पाच्या कामावरील मजुरांच्या झालेल्या अपघाताबाबत वेलजाळी यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वावी टोला प्लाझा येथे सलग बारा दिवस धरणे आंदोलन करूनही प्रशासन दाद देत नसल्याने शुक्रवारी दुपारपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
त्यांनी अन्नत्याग करू नये यासाठी वावीचे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, सिन्नर-शिर्डी महामार्ग प्रकल्पाचे नियंत्रण करणाऱ्या खासगी एजन्सीचे प्रतिनिधी, मोंटेकारलो कंपनीचे प्रतिनिधी यांनी प्रयत्न केले. मात्र, मागण्यांसदर्भात योग्य कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे श्री. वेलजाळी यांनी सांगितले. (latest marathi news)
रक्तदाब वाढल्याने धोका
वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्री. वेलजाळी यांची तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब वाढल्याचे आढळून आले. रक्त पातळ होण्याची नियमित गोळी दोन दिवसांपासून त्यांनी घेतली नसल्याने प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो असा अहवाल आरोग्य विभागाने वावी पोलिस ठाण्यास दिला आहे.
"न्हाईचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करावी व मागण्यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन द्यावे. प्रतिनिधीमार्फत लेखी पत्रव्यवहार मान्य करणार नाही असे वारंवार कळवले होते. त्यामुळे अंतिम पर्याय म्हणून शुक्रवारी लेखी स्वरूपात पूर्वकल्पना देऊन अन्नत्याग आंदोलनास सुरवात केली आहे."
- दीपक वेलजाळी, उपतालुकाप्रमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.