Nashik ZP News : जिल्हा परिषदेतील ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांनी बदलीसाठी सादर झालेले दिव्यांग प्रमाणपत्राबाबत तक्रारी झाल्या. यातच हे प्रकरण थेट ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोचले. त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्राच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Nashik Verification of certificate of disabled employees marathi news)
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागांना पत्र काढून पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पडताळणीचे आदेश मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. इगतपुरी तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी पाटील यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या मोठ्या तक्रारी झाल्या. ग्रामविकासमंत्री महाजन यांच्याकडे संबंधित प्रकरण गेल्यानंतर प्रशासनाला चौकशीचे आदेश काढावे लागले.
त्यानंतर प्रशासनाने चौकशी समितीची नियुक्ती करत चौकशी केली व अहवाल सादर केला. मात्र, यातून दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा ऐरणीवर आल्याने ज्या कर्मचाऱ्यांनी बदली प्रक्रियेत दिव्यांग प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे, तसे निर्देश मित्तल यांनी दिले आहेत.
२ ऑक्टोबर २०१८ पासून दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने दिले आहे. या प्रमाणपत्राची पडताळणीही संकेतस्थळावरून प्रत्यक्षात करण्यात यावी. संबंधित कर्मचाऱ्यांनी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र व संकेतस्थळावरील मूळ प्रमाणपत्र यांची समोरासमोर पडताळणी करावी.
तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी २०१८ पूर्वीचे ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले आहे, त्यांना १० मार्च २०२४ पर्यंत तातडीने ऑनलाइन प्रमाणपत्र काढण्याची किंवा संबंधित प्राधिकरणाकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची सूचना देण्यात यावी.
यापुढे ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र जोडून नस्त्या माझे कार्यालयास सादर करू नये, अशा नस्त्या माझ्या निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे मित्तल यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे.
अंमलबजावणी होणार का?
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रबाबत यापूर्वीही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. कर्मचाऱ्यांची नियमित बदली प्रक्रिया राबविताना ही मुद्दा उपस्थित झाला होता. प्रामुख्याने आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी सोयीच्या बदल्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याच्या तक्रारी होत्या.
त्या वेळी या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय झाला होता. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. केवळ कागदावरच ही कारवाई दिसली. त्यामुळे आता तरी पडताळणी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ( latest marathi news )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.