mahayuti vs mahavikas aghadi  esakal
नाशिक

Nashik Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीपूर्वीच आघाडी, युतीमध्ये जागेवरून तंटे! घटक पक्षांबरोबरच पक्षांतर्गत कुरबुरींचा सामना

Vidhan Sabha Election 2024 : महाविकास किंवा महायुतीकडून एखाद्या पक्षाला जागा सुटली तरी पक्ष संघटनेच्या अंतर्गत वादालादेखील उमेदवार व पक्षातील विरोधकांना सामोरे जावे लागणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून राजकीय कुस्तीची रंगीत तालीम सुरू झाली असताना महाविकास आघाडी किंवा महायुती म्हणून निवडणूक लढविणाऱ्या घटक पक्षांमध्येच मतदारसंघावरून दावे-प्रतिदावे सुरु झाले आहे.

त्यामुळे निवडणुकीपूर्वीच घटक पक्षांतर्गत वादाचे फटाके फुटण्यास सुरवात झाली असून, महाविकास किंवा महायुतीकडून एखाद्या पक्षाला जागा सुटली तरी पक्ष संघटनेच्या अंतर्गत वादालादेखील उमेदवार व पक्षातील विरोधकांना सामोरे जावे लागणार आहे. (Vidhan Sabha Election 2024 mahavikas aghadhi mahayuti conflict over seat)

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक येत्या काळात होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून शहरातील चारही मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मिळावे सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच दौरा करून इच्छुकांचे अर्ज मागविले.

काँग्रेसनेदेखील इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. महायुतीमध्ये भाजपकडून शनिवारी (ता. २६) प्रभारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे. शिवसेनेच्या शिंदे पक्षात मात्र अद्यापपर्यंत हालचाल दिसत नसली तरी लवकरच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मिळावे घेऊन चाचपणी केली जाणार आहे.

अजित पवार पक्षाकडूनदेखील मध्य व पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. एकंदरीत महाविकास आघाडी व महायुती एकसंध असल्याचा दावा केला जात असला तरी एकाच विधानसभा मतदारसंघात आघाडी व युतीमधील अनेक पक्ष इच्छुक असल्याने निवडणुकीपूर्वी वादाला तोंड फुटणार आहे.

आघाडी किंवा युतीमधील एखाद्या पक्षाला उमेदवारी मिळाली तरी घटक पक्षांचे इच्छुकांमध्ये नाराजी तसेच पक्षांतर्गत नाराजीदेखील बाहेर येणार आहे. प्रत्यक्ष प्रचाराच्या काळात या नाराजीचा फटका राजकीय पक्षांना बसेल, असा अंदाज आहे. उमेदवार किती सक्षम आहे किंवा सांभाळून घेण्याची क्षमता हा निकष यावेळी महत्त्वाचा ठरेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. (latest marathi news)

विधानसभेवर दाव्यासाठी शर्यत

नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघाचा विचार करताना महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उबाठा पक्षाकडून मध्य, देवळाली, पश्‍चिमवर दावा करण्यात आला आहे, तर शरदचंद्र पवार पक्षाने पूर्व, मध्य, पश्‍चिम तसेच देवळाली या मतदारसंघावरदेखील दावा केला आहे. काँग्रेसला पूर्व व मध्य विधानसभा मतदारसंघ हवा आहे.

महायुतीमध्ये देवळाली वगळता पूर्व, पश्‍चिम व मध्य विधानसभा मतदारसंघावर तर दावा आहेच, त्याशिवाय देवळाली मतदारसंघात पक्षातील इच्छुकांकडून दोन-तीन वर्षांपासून तयारी सुरु असल्याने देवळालीची जागा सोडणे भाजप संघटनेला जड जाईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाने तर पूर्व, मध्य व देवळाली विधानसभा मतदारसंघावर दावादेखील ठोकला आहे.

महायुतीमधील रिपाई (आठवले गट) देखील देवळालीतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. शिवसेनेच्या शिंदे पक्षाला नाशिक मध्य व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ हवा आहे. अर्थात आघाडी व युतीमधील जागा वाटपानंतर चित्र स्पष्ट होणार असले तरी तूर्त विधानसभेवर दावा सांगण्यासाठी दोन्हीकडे शर्यत लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ही धारणा चुकीची; लगेच नवीन सरकार अस्तित्वात येणे बंधनकारक नाही, यापूर्वी 'इतक्या' वेळा विधानसभेची मुदत संपल्यानंतर शपथविधी

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Rishabh Pant IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंतला बम्पर लॉटरी! SRH, LSG यांनी जबरदस्त जोर लावला; श्रेयसचा 26.75cr चा विक्रम मोडला

Shreyas Iyer IPL Mega Auction 2025 : श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, PBKS ने मोजली तगडी रक्कम

SCROLL FOR NEXT