Nashik News : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्ग (नाशिक रिंगरोड) प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. नाशिक परिक्रमा मार्ग (नाशिक रिंग रोड) प्रकल्पाची सद्य:स्थिती, सादरीकरण आणि आढावा बैठक मंत्री पालकमंत्री भुसे यांच्या दालनात मंगळवारी (ता. २) झाली. (Simhastha Kumbh Mela)
या वेळी नाशिक विकास महानगर प्राधिकरणाचे आयुक्त सतीश खडके, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते, वर्षा अहिरे- पवार, कार्यकारी अभियंता रंजना दळवी, महाव्यवस्थापक दत्तप्रसाद नडे, विलास कांबळे.
कार्यकारी अभियंता प्रा. नि. नाईक, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एम. डी. शेख आदी उपस्थित होते. पालकमंत्री भुसे म्हणाले की, नाशिकच्या नागरिकरणात वेगाने वाढ होत आहे. मुंबई, पुणे मार्गाने होणारी वाहतूक शहरातून जात असल्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचे प्रश्न निर्माण होत आहेत.
नाशिक शहरातील वर्दळ, रस्ते, बाहेरून येणारी वाहतूक व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा होणारा परिणाम पाहता नाशिक शहरात येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक शहराबाहेरून वळविणे आवश्यक आहे. नाशिक शहरातून नाशिक- पुणे, नाशिक- वलसाड, मुंबई- नाशिक, नाशिक- मालेगाव हे महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात. (latest marathi news)
या मार्गावरील सर्व प्रकारची आंतरराज्य वाहतूक तसेच राज्यांतर्गत वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी नाशिक शहरात येणारी सर्व प्रकारची वाहतूक शहराबाहेरून नाशिक परिक्रमा मार्गाने (रिंग रोड) वा जलद निर्गमन मार्गाने वळविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रस्तावित परिक्रमा मार्ग हा ६५.४१ किलोमीटर लांबीचा असून प्रस्तावित रुंदी ६० मीटर एवढी आहे.
त्यासाठी ४००.९३ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यासाठी अंदाजित २६०४.४३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. प्रस्तावित नाशिक परिक्रमा महामार्गासाठी विविध पर्याय आखणीचा सविस्तर अभ्यास करून इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांनुसार श्रेयस्कर पर्यायी आखणी अंतिम करण्याबाबतची कार्यवाही प्रगती पथावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.