Such garbage is thrown near the Tileshwar Ganesha temple. esakal
नाशिक

Nashik News : घंटागाड्या नियमित असूनही उघड्यावर कचरा; दंडात्मक कारवाई करण्याची जागृत नागरिकांची मागणी

Nashik : शहरासह पंचवटीतील विविध प्रभागात कचरा संकलनासाठी नियमित घंटागाड्या येतात.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरासह पंचवटीतील विविध प्रभागात कचरा संकलनासाठी नियमित घंटागाड्या येतात. परंतु असे असूनही उघड्यावर कचरा टाकण्याच्या मानसिकतेत मोठी वाढ झाली आहे. मुख्य रस्त्यासह गल्लीबोळात सर्रास कचरा फेकल्याने शहराच्या सौंदर्यीकरणास गालबोट लागत आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा जागृत नागरिकांनी केली आहे. (Vigilant citizens demand penal action for littering in open )

पंचवटीतील विविध भागात रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो, त्या ठिकाणी घंटागाड्या नियमित येत असल्याचे आढळून आले आहे. उघड्यावर कचरा टाकून शहराच्या बकालपणात वाढ होत आहे. याबाबत ‘सकाळ’ने यापूर्वीही वृत्त प्रकाशित करत याकडे लक्ष वेधले होते, परंतु तरीही हे प्रकार कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहेत..

येथे टाकला जातोय कचरा

दिंडोरी रोडवरील विद्युतनगर, मायको दवाखान्यासमोर, गोदावरी डावा कालवा परिसर, नाग चौक, गणेशवाडी, तपोवन रोड, आरटीओ परिसर, पेठ रोड, हिरावाडीतील पाट परिसर, आयुर्वेद सेवा संघाजवळ, नवीन शाही मार्ग, पंचवटी स्मशानभूमीजवळ, मुंबई- आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोड, मखमलाबाद रोड, वाघाडी नाला. (latest marathi news)

पाट की गटारगंगा संभ्रम

गोदावरी नदीवर गंगापूर धरणातून डावा व उजवा, असे दोन कालवे काढले होते. सध्या केवळ डावा कालवा सुरू आहे. पंचवटी भागातून जाणाऱ्या या कालव्यात परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात. त्यामुळे हा पाट की गटार, असा प्रश्‍न पडतो. नागरी वस्तीतून जाणारा हा पाट किमान काही ठिकाणी तरी बंदीस्त करावा, म्हणजे त्यात कचरा टाकला जाणार नाही, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. पाटाला पाणी सोडल्यास हा कचरा थेट शेतात वाहून जातो.

''शहरासह पंचवटीतील सर्वच प्रभागांत नियमित घंटागाड्या चालू आहेत, त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकून महापालिकेच्या स्वच्छता अभियानास सहकार्य करावे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू असून ती यापुढेही सुरूच राहील.''- मदन हरिश्‍चंद्र, विभागीय अधिकारी, महानगर पालिका

''नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकून शहराच्या सौंदर्यीकरणात बाधा आणू नये. हे शहर आपले असून ते स्वच्छ ठेवण्याची आपली सामुहिक जबाबदारी आहे. घराजवळ येणार्या घंटागाडीतच कचरा टाकावा.''- रोहित कानडे, अध्यक्ष, नव-नाथपंथी सामाजिक संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT