Smashan Bhumi (file photo)  esakal
नाशिक

Nashik News : पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील गाव स्मशानभूमीपासून वंचित!

Nashik News : जिल्ह्यात चारशेहून अधिक गावे यातही सुरगाणा तालुक्यातील सर्वाधिक गावे अद्यापही स्मशानभूमीपासून वंचित असल्याचे वास्तव ‘सकाळ’ने वेळोवेळी मांडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात चारशेहून अधिक गावे यातही सुरगाणा तालुक्यातील सर्वाधिक गावे अद्यापही स्मशानभूमीपासून वंचित असल्याचे वास्तव ‘सकाळ’ने वेळोवेळी मांडले आहे. हे वास्तव असतानाच आता खुद्द पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघातही स्मशानभूमी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. (village in constituency of Guardian Minister is deprived of cemetery)

वळवाडे (ता. मालेगाव) येथे स्मशानभूमी नसल्याने स्मशानभूमी मिळावी, यासाठी त्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला साकडे घातले आहे. याशिवाय या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनादेखील निवेदन देत स्मशानभूमीची मागणी केली आहे. वळवाडेचे उपसरंपच जितेंद्र राऊत, गंगाधर देशमुख.

जीवन वाघ, युवराज सोनवणे, निवृत्ती पवार यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना गावात स्मशानभूमी मिळावी, अशी मागणी केली आहे. मौजे वळवाडे येथे अंत्यविधी करणेकामी स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी नदीकाठी स्मशानभूमी होती; परंतु सप्टेंबर २०२० मध्ये कमलदरा धरण फुटल्याने स्मशानभूमी पुरात वाहून गेली.

तेव्हापासून आजतागायत अंत्यविधीसाठी गावात कोणतेही सोय करण्यात आलेली नाही. अंत्यविधीसाठी वैयक्तिक शेतात किंवा गावापासून १५ ते २० किलोमीटरवर गावठाण जागेवर जावे लागते. सप्टेंबर २०२० मध्ये कमलदरा धरण फुटल्यापासून आजपर्यंत पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी सात ते आठ वेळा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. (latest marathi news)

वळवाडे येथे स्मशानभूमी, दहनशेड, दहन ओटा, बैठकव्यवस्था, पूर संरक्षण भिंत, कंपाउंड व इतर आनुषंगिक कामे मंजूर झाल्यास ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. गावात स्मशानभूमी मंजूर करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. स्मशानभूमी न दिल्यास आंदोलनाचा इशाराही यात देण्यात आलेला आहे.

पत्रावर, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्या सोनाली पवार, किशोर देशमुख, नानाजी मोहिते, रवींद्र पवार, संदीप हिरे, मधुकर सोनवणे, तीर्थराज सोनवणे, रमेश पाटील, दिनेश नामदास, कोमल देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT