Viral Infection Disease esakal
नाशिक

Nashik Viral Infection Disease: हर घर सर्दी, खोकला तापाचे रुग्ण! बदलत्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ

सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तालुक्याच्या अनेक भागांत हुडहुडी भरत आहे. रोगट वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

विजय पगारे

इगतपुरी : गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा खालीवर सरता राहिला. हवेत गारवा व अंगाला झोंबणारी थंडीची तीव्रता जाणवू लागली आहे.

सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तालुक्याच्या अनेक भागांत हुडहुडी भरत आहे. रोगट वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. (Nashik Viral Infection Disease Cold cough and fever patients in every house Increase in number of patients due to changing environment)

सध्या अनेक गावांमध्ये हर घर सर्दी, खोकला, ताप, अपचनाचा त्रास, हात-पाय दुखणे, अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. दुपारी कडक ऊन, तर सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवत असल्याने आजार बळावत आहेत.

विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांना वातावरणाचा त्रास होत आहे. सर्दी, खोकला आणि तापाच्या आजारांचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यातच कोरोनाचा नवीन आलेल्या व्हेरिएंट व त्याच्या संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी रोग प्रतिकारक क्षमता वाढविणारी जीवनशैली जपावी, असा सल्ला डॉ. स्वाती गाडे यांनी दिला आहे. सकाळी धुके व गारवा, तर दुपारी उन्हाचा तडाखा बसत आहे.

ढगाळ वातावरणाने धास्तावला बळीराजा

तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊसामुळे भात शेतीचे नुकसान झाले असून, काही भागात भाताच्या शेतात अद्यापही ओलावा आहे.

आता चितेंचे ढग गडद झाले आहेत. भाजीपाला व इतर पिकांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नुकसानीच्या भितीने बळीराजा आधिक प्रमाणात धास्तावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT