Nashik News : दहावी, बारावीनंतर पर्यायाची निवड म्हणजे आयुष्यभराचा प्रश्न असल्याने नेमक्या कुठल्या पर्यायाची निवड करावी, याबाबत पालक-विद्यार्थ्यांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. करिअरचा पर्याय निवडणे सोयीचे जावे, सर्व पर्यायांची माहिती एका छताखाली उपलब्ध होण्यासाठी ‘सकाळ’तर्फे ‘सकाळ विद्या एक्स्पो २०२४’ शैक्षणिक प्रदर्शन आयोजित केले आहे. (Sakal Vidya Expo 2024)
शुक्रवार (ता. १४)पासून हे दालन विद्यार्थी, पालकांसाठी खुले होईल. पुढील तीन दिवस रविवार (ता. १६)पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठदरम्यान सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका सभागृहातील या प्रदर्शनाला भेट देत करिअरच्या विकल्पांची माहिती जाणून घेता येईल. इयत्ता दहावी, बारावीचे निकाल जाहीर झालेले असून, येत्या काही दिवसांत विविध सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सध्याचा कालावधी अभ्यासक्रमाची निवड करण्याच्या दृष्टीने विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ही गोष्ट लक्षात घेत, त्यांच्या शंकांचे समाधान करताना, सर्वोत्तम पर्यायांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘सकाळ विद्या एक्स्पो २०२४’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात विविध नामांकित संस्थांचे स्टॉल्स सहभागी झालेले आहेत. त्यांच्या प्रतिनिधींकडून भेट देणाऱ्या विद्यार्थी पालकांना माहिती देणे, समुपदेशन सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे गोंधळून न जाता अभ्यासक्रमाची निवड करण्यापूर्वी विद्यार्थी, पालकांनी या प्रदर्शनाला एकदा भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
मार्गदर्शन सत्रांतून करा शंकांचे निरसन
या प्रदर्शनानिमित्त मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन केले आहे. यात विद्यार्थी, पालकांना त्यांच्या शंकांचे निरसन करून घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा दुहेरी लाभ होणार आहे. (latest marathi news)
‘सकाळ विद्या एक्स्पो’बाबत..
कधी- १४ ते १६ जून २०२४
वेळ- सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान
कुठे- लक्षिका सभागृह, सिटी सेंटर मॉलसमोर, उंटवाडी, नाशिक
काय आहे ‘सकाळ विद्या एक्स्पो’ प्रदर्शनात...
- नामांकित शैक्षणिक संस्थांचे स्टॉल्स
- करिअरविषयी मार्गदर्शन चर्चासत्रे
- चर्चेतून वैयक्तिक स्वरूपातील मार्गदर्शन
- करिअर कौन्सिलिंगची सुविधा
- विद्यार्थी संवादातून विचारांचे आदानप्रदान
- नेटवर्किंगची असेल संधी
यांचा असेल प्रदर्शनात सहभाग...
‘सकाळ विद्या एक्स्पो २०२४’ या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक मराठा विद्याप्रसारक समाज संस्था (मविप्र संस्था) हे आहेत. पॉवर्ड बाय के. के. वाघ शिक्षण संस्था आयोजित प्रदर्शनासाठी सह-प्रायोजक पीडब्ल्यू विद्यापीठ फिजिक्सवाला, तर प्रायोजकांमध्ये अशोका बिझनेस स्कूल आणि ब्रह्मा व्हॅली एज्युकेशन कॅम्पस यांचा समावेश आहे.
प्रदर्शनात ‘मविप्र’ संस्था, धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी (डीआयडीटी), सपकाळ नॉलेज हब, आकाश इन्स्टिट्यूट, अशोका बिझनेस स्कूल, के. के. वाघ शिक्षण संस्था, गुरू गोविंदसिंग फाउंडेशन, पीडब्ल्यू विद्यापीठ फिजिक्सवाला, ब्रह्मा व्हॅली, सुदर्शन ॲकॅडमी एनडीए-एसपीआय, तोतलेज् कॉमर्स ॲकॅडमी.
युनियन बँक ऑफ इंडिया, एमबी पाटील एज्युकेशन इन्स्टिट्यूट, उका तरसाडिया युनिव्हर्सिटी यांचा सहभाग असेल. प्रदर्शनासाठी गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्ट्स प्रा. लि., इव्हेंट पार्टनर स्पायडर मीडिया हाउस, डिजिटल पार्टनर गुरू पब्लिसिटी, आउटडोअर पार्टनर इशा पब्लिसिटी, नर्सरी पार्टनर पपया नर्सरी, बँकिंग पार्टनर युनियन बँक ऑफ इंडिया हे आहेत.
गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप
‘सकाळ विद्या एक्स्पो’निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे. त्यासाठी इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला जाईल. १५ व १६ जूनला हा सत्कार केला जाणार असून, स्तुत्य उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विविध शैक्षणिक संस्थांमधील दहावी, बारावीच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अवश्य पाठवून शैक्षणिक क्षेत्रातील विविध पर्यायांबाबत माहिती, सत्कार समारंभ व प्रशस्तीपत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.