Krantiveer Vasantrao Narayanrao Naik Education Institute esakal
नाशिक

Nashik News : व्ही. एन. नाईक संस्था निवडणुकीत उमेदवारांना ‘भगरे पॅटर्न’ची धास्‍ती

Nashik News : यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ‘भगरे पॅटर्न’ने राज्‍यभराचे लक्ष वेधले.

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ‘भगरे पॅटर्न’ने राज्‍यभराचे लक्ष वेधले. नाव व चिन्‍हसाधर्म्यामुळे मिळालेल्‍या मतांमुळे चर्चेत आलेला हा पॅटर्न विविध निवडणुकांमध्ये आजमावला जातो आहे. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या निवडणुकीतही हा पॅटर्न आजमावला जाण्याची शक्‍यता असल्‍याने इच्‍छुकांनी धास्‍ती घेतली आहे. (Krantiveer Vasantrao Narayanrao Naik Education Institute election)

प्रारूप यादी प्रसिद्ध होताच इच्‍छुक व विरोधकांकडून साम्य असलेल्‍या नावांचा शोध सुरू झाला आहे. व्‍ही. एन. नाईक शिक्षण संस्‍थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. २) प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली. या यादीत आपली नावे आहेत का, याची पडताळणी करण्यासाठी अनेक सभासदांनी दिवसभर संस्‍थेच्‍या शैक्षणिक संकुलाला भेट देताना गर्दी केली होती.

गंगापूर रोडवरील व्‍ही. एन. नाईक शैक्षणिक संकुलातील विद्यालय प्रांगणात यादी उपलब्‍ध करून दिली होती. एकीकडे सभासदांकडून यादीत नावाचा शोध घेतला जात असताना इच्‍छुकांकडूनही भिंग लावून यादी बघितली जात होती. याचे महत्त्वाचे कारण म्‍हणजे अनेक उमेदवारांनी भगरे पॅटर्नची धास्‍ती घेतली आहे.

आपल्‍या नावासारखेच इतर कुठले नाव तर मतदार यादीत नाही ना, याचा शोध घेण्यासाठी उमेदवार, त्‍यांच्‍या समर्थकांनी कार्यालयाच्‍या आवारात धाव घेतली होती. ज्‍यांना आपल्‍या नावसाधर्म्याची व्‍यक्‍ती आढळली, अशांनी संबंधित सभासदांचा शोध आतापासून सुरू केला आहे. (latest marathi news)

काय आहे भगरे पॅटर्न?

यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात विजयी झालेले भास्‍कर भगरे यांच्‍या नावसाधर्म्य असलेले बाबू भगरे या अपक्ष उमेदवाराने थोडीथोडकी नव्‍हे तर एक लाखाच्‍या घरात मते मिळविली होती. नाव आणि चिन्‍हातील साम्‍यता यामुळे ही किमया झाल्‍याने हा पॅटर्न राज्‍यभर चर्चेत आला. पुढे विधान परिषदेच्‍या निवडणुकीतही हा फंडा आजमावला गेला.

अकरा हरकती झाल्‍या प्राप्त

नाईक शिक्षण संस्‍थेच्‍या सभासदांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत आठ हजार ६९२ सभासद मतदारांच्‍या नावाचा समावेश आहे. यादीसंदर्भात हरकती मागविण्यात आल्‍या असून, पहिल्‍या दिवशी अकरा हरकती प्राप्त झाल्‍याची माहिती निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. जालिंदर ताडगे यांनी दिली.

प्राप्त हरकतींमध्ये सामान्‍यपणे नावात दुरुस्‍ती, नावात बदल, यादीत नाव नसणे अशा स्वरूपाच्‍या हरकती आहेत. संबंधितांना आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता तसेच विहित अर्ज सादर करण्यास सांगितले असून, पडताळणी करून हरकतींचा निपटारा केला जाणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT