V. N. Naik Institution Election : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रथमच चार पॅनल रिंगणात उतरल्याने झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक व सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने बाजी मारली. रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेल्या २३ जागांपैकी तब्बल १९ जागांवर प्रगती पॅनलने विजय मिळवला आहे. (Flag of progress on educational institutions by ruling Krantiveer Development Panel )
माजी अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिवीर विकास पॅनलचा आणि नवऊर्जा पॅनलचा धुव्वा उडाला आहे. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या २९ जागांसाठी रविवारी (ता. २८) पंचवटीतील भावबंधन मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. तब्बल साडेचार तास उशिराने सुरू झालेल्या मतमोजणीत सुरवातीला मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात आले.
मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला दुपारी साडेतीनला सुरवात झाली. सर्वाधिक सहा जागांसाठी असलेल्या विश्वस्त व नाशिक गटातील चार जागांसाठी प्रथम मतमोजणी झाली. पहिला निकाल सायंकाळी सव्वासातला जाहीर झाला. नाशिक शहर तालुका गटातून प्रगती पॅनलचे तीन, तर परिवर्तन पॅनलचा एक उमेदवार विजयी झाला. विश्वस्त पदासाठी असलेल्या सहा जागांपैकी पाच जागांवर प्रगती पॅनलचे, तर एका जागेवर परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजय झाले.
निफाड तालुका गटातून तीन जागांपैकी दोन जागांवर ‘प्रगती’चे, तर एका जागेवर परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. सिन्नर तालुका गटातून तिन्ही जागांवर प्रगती पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली. यापाठोपाठ झालेल्या महिला राखीव गटातून दोन्ही जागांवर प्रगती पॅनलने विजय मिळवला. दिंडोरी तालुका गटातूनही प्रगती पॅनलचे दोन, तर परिवर्तन पॅनलचा एक उमेदवार विजयी झाला. या चारही गटांमध्ये सत्ताधारी क्रांतिवीर विकास पॅनल आणि नवऊर्जा पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. (latest marathi news)
असे आहे विजयी उमेदवार (मिळालेली मते)
विश्वस्त : (६ जागा)
प्रगती : दामोदर मानकर (२५५३), अशोक नागरे (२१०६), बबनराव सानप (२०९९), नामदेव काकड (२०६८), नारायण काकड (२०४९). परिवर्तन : लक्ष्मणराव जायभावे (२२३५)
नाशिक तालुका शहर (४ जागा)
प्रगती : प्रकाश घुगे (२५४१), प्रल्हाद काकड (२४३९), बाळासाहेब धात्रक (२३२५), परिवर्तन : गोकुळ काकड (२२२२)
सिन्नर तालुका (३ जागा)
प्रगती : जयंत आव्हाड (२४८१), समाधान गायकवाड (२४७३), हेमंत नाईक (२३३९)
निफाड तालुका (३ जागा)
प्रगती : पुंजाहरी काळे (२५०४), बंडू दराडे (२३५३), परिवर्तन : उद्धव कुटे (२३३६), महिला राखीव (२ जागा), प्रगती : रेखा कातकडे (२५५१), नंदा भाबड (२४१६)
दिंडोरी तालुका (३ जागा)
प्रगती : शरद बोडके (२५९३), राजेश दरगोडे (२३५०), परिवर्तन : सुभाष आव्हाड (२३०४)
येवला तालुका (२ जागा)
प्रगती : रमेश वाघ (२३३७), संपत वाघ (२३२३)
या सत्ताधाऱ्यांचा झाला पराभव
सुभाष कराड, भास्कर सोनवणे, बाळासाहेब वाघ, विलास आव्हाड, विष्णू नागरे, सुरेश घुगे, विठोबा फडे, श्याम बोडके, शोभा बोडके, उत्तम बोडके, भगवंत चकोर, तुळशीराम विंचू, ॲड. जयंत सानप
आतषबाजी अन् गुलालाची उधळण
रात्री नऊच्या सुमारास जसजसे निकाल जाहीर होऊ लागले, तसतशी भरपावसात आतषबाजी आणि गुलालाची उधळण सुरू झाली. साडेनऊच्या दरम्यान प्रगती पॅनलची घोडदौड लक्षात आल्याने या पॅनलच्या उमेदवारांनी मतमोजणी परिसरात जमण्यास सुरवात केली. मध्यरात्रीच्या सुमारास अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.