Nashik News : सर्व देशाचे लक्ष वेधलेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अर्थात सिनेमागृहात ‘लाइव्ह’ बघण्याची संधी मिळणार आहे. ९९ रुपये तिकीट असलेल्या कॉलेज रोड येथील द झोन सिनेमागृहात सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निवडणुकीचा अंतिम निकाल पाहता येणार आहे. (Watch live result of election in theaters today)
आजचा निकाल सर्व टीव्ही माध्यमांमध्ये तसेच सोशल मिडियावर लाइव्ह असणार आहे पण, या वेळी महाराष्ट्रात मोठ्या पडद्यावर निवडणुकीचा निकाल बघण्याची मजा काही औरच असणार आहे. सिनेमा आणि राजकारण दोन्ही क्षेत्र एकमेकांना पूरक आहेत. राजकारणातील रंजक घटना, नेत्यांवरही सिनेमे, सिरिज बनविल्या जातात आणि नेते मंडळी आपल्या भाषणात सिनेमातील अभिनेत्याचे फेमस डायलॉग प्रचार करताना, भाषण ठोकतांना सर्रास वापरतात.
म्हणूनच सध्या ‘बिघडलेल्या’ राजकारणाकडे मनोरंजन म्हणून पाहिले जात आहे. शनिवारी (ता.१) सायंकाळपासून सुरू झालेल्या ओपिनियन पोल, एक्झिट पोल आणि रिझल्ट या क्रमवारीनुसार अनेक मीम्स, रिल्स बनविले गेले. आता त्याचाच पुढचा भाग म्हणून निकाल मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, चित्रपटप्रेमी असणाऱ्या मालेगाव सारख्या ठिकाणी अभिनेता सलमान खानचे सिनेमे लागतात तेव्हा थेट सिनेमागृहात फटाके उडविले गेले.
इथे सिनेमागृहात थेट निकाल दाखविला गेल्यास उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये भांडण होण्याची, तोडफोड, बाहेर फटाके उडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकीकडे मनोरंजन म्हणून बघितलेल्या निकालाचे विपरीत परिणाम होणार नाही त्यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. दरम्यान तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू असली तरी काल सायंकाळपर्यंत पाहिजे तसा प्रतिसाद तिकीट विक्रीला मिळाला नव्हता. (latest marathi news)
या चित्रपटगृहात बघता येणार
नाशिक : द झोन, कॉलेज रोड
मुंबई : मूव्ही मॅक्स, सायन
पुणे : मूव्हीमॅक्स, अनामोरा थिएटर
नागपूर : मूव्हीमॅक्स, इटर्निटी नगर
"भारतात सतत कुठल्या न कुठल्या निवडणूका चालू असतात आणि जनतेला आयपीएल मॅच सारखा रस या निवडणुकांच्या निकालामध्ये असतो. राजकारणाचे सिनेमाकरण आणि आयपीएलकरण यांनी निवडणुका आणि त्यांच्या निकालांना मनोरंजनाचा परमोच्च बिंदूवर नेऊन ठेवले आहे. त्याची पुढची पायरी राजकारण थिएटरमध्ये पोचणे हीच होती, ते आता घडत आहे." - अमोल उदगीरकर, चित्रपट अभ्यासक, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.