नाशिक : येत्या लोकसभा निवडणुकीत ८० वर्षांवरील मतदारांना घरूनच टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी दिव्यांगांसाठीच ही सुविधा होती. मार्च महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने प्रत्येक मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पूर्ण सज्ज राहाण्याच्या सूचना देताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन जाणून घेतले. (Nashik vote by mail from home marathi news)
लोकसभा निवडणुकीची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघांचे अधिकारी अर्थात उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांची बैठक शर्मा यांनी घेतली. त्यामध्ये निवडणूक जाहीर होण्यापासून ते मतदानाच्या तारखेपर्यंत सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन कसे कराल, याची चाचपणी केली.
तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदार यादी तयारी, स्ट्रॉंगरुम, मतदान यंत्र, साहित्य वितरण, मतदानानंतर केंद्रीय वेअर हाऊसमध्ये मतदान यंत्र सुरक्षितपणे जमा करण्याची व्यवस्था, अशा सर्वच बाबींच्या नियोजनाचीही माहिती शर्मा यांनी घेतली. (Latest Marathi News)
वयस्कर व्यक्तींना घरूनच मतदानामुळे आता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे काम वाढले आहे. अशा मतदारांना शोधून निवडणुकीच्या दिवशी त्यांना सुविधा द्यावी, एकही मतदार मतदानापासून वंचित राहाता कामा नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत
आचारसंहितेची तत्काळ अंमलबजावणी व्हावी
निवडणूक जाहीर होताच आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तत्काळ राजकीय पक्षांचे, नेत्यांचे जाहीर होतील असेल बॅनर, झेंडे काढावेत. कंट्रोल रूम सुरु करावा. सर्व पथके कार्यान्वित करावीत. व्हीडीओ ग्राफर्स पथकांसह खर्च निरीक्षक पथकांनाही कार्यान्वित करावे. राजकीय पक्षांच्या रॅली, खर्चावर लक्ष ठेवणे या बाबी तत्काळ सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.