Naik Education Institute Election  esakal
नाशिक

V. N. Naik Institution Election : व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसाठी आज मतदान!

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. २७) मतदान होत आहे. संस्थेच्या २९ जागांसाठी चार पॅनल रिंगणात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. २७) मतदान होत आहे. संस्थेच्या २९ जागांसाठी चार पॅनल रिंगणात आहेत. यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अध्यक्षपदासाठी पंढरीनाथ थोरे, कोंडाजीमामा आव्हाड, तानाजी जायभावे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सरचिटणीसपदासाठी हेमंत धात्रक, माजी आमदार बाळासाहेब सानप, शिवाजी मानकर, अभिजित दिघोळे यांच्यात सामना होत आहे. (V. N. Naik Institution Election)

१५ दिवसांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर चारही पॅनलच्या नेतृत्वाने विजयाचा दावा केला आहे.
शनिवारी (ता. २७) सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात मतदान होईल. संस्थेचे एकूण आठ हजार ४१७ सभासद असून, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीससह २५ जागांसाठी एकूण ११८ उमेदवार रिंगणात आहेत.

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, शिवाजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर विकास पॅनल, विद्यमान सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनल, माजी अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल, तर मनोज बुरकुले व अभिजित दिघोळे यांच्या नेतृत्वाखालील नवऊर्जा पॅनल असे चार पॅनल रिंगणात उतरले आहेत.

संस्थेच्या इतिहासात प्रथमच चार पॅनल एकमेकांसमोर ठाकले आहेत. सर्वच पॅनलने नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचा दावा केला. प्रत्यक्षात नव्या-जुन्यांचा मेळ घालत पॅनल रिंगणात उतरविले. गत १५ दिवसांपासून सर्वच पॅनलने सभासदांच्या गाठी-भेटी, चौकसभा घेत प्रचार केला. यात संस्थेचे कामकाज, वारस सभासद, भ्रष्टाचार यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. विशेषत: सोशल मीडियाच्या माध्यमातून यंदा प्रचारावर जोर देण्यात आला. चारही पॅनलच्या नेतृत्वाकडून सभासदांचा कौल आम्हाला असल्याचे सांगितले जात आहे. (latest marathi news)

"पॅनलच्या माध्यमातून सभासदांकडे भूमिका मांडली. नवे शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी संस्था स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यावर भर राहील. वंचित घटकापर्यंत शिक्षण घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. संस्थेच्या विकासाचा दृष्टिकोन असलेले सक्षम उमेदवार दिले आहेत. संस्थेचे पारदर्शक कामकाज पाहता सभासद आम्हाला कौल देतील." - तानाजी जायभावे, अध्यक्षपदाचे उमेदवार, प्रगती पॅनल

"संस्थेच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय निश्चित करून सर्वांना सोबत घेऊन काम करणार. मूळ मृत सभासदांच्या वारस नोंदणी करून या माध्यमातून तरुणांना संस्थेत सामावून घेतले जाईल. विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून संस्थेच्या ब्लू प्रिंट तयार करून काम करणार. पॅरेमेडिक, नर्सिंग, फार्मसी कोर्सेस, कृषी आदी कोर्सेस सुरू केले जातील. संस्थेची सीबीएस आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, तसेच मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारले जाईल." - कोंडाजीमामा आव्हाड, अध्यक्षपदाचे उमेदवार, परिवर्तन पॅनल

"गत पाच वर्षांत अनावश्यक खर्चात काटकसर करून आर्थिक शिस्त आणली. संस्थेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही कठोर निर्णय घेत, संस्थेची आर्थिक बाजू भक्कम केली. संस्थेच्या खात्यावर २८ कोटींची रक्कम शिल्लक आहे. पाच वर्षातील कामकाजाला सभासदांनी पाठिंबा दिला. मतदानातून हा पाठिंबा मिळेल, हा विश्वास आहे. संस्थेचा सर्वांगीण विकास करणार."
- पंढरीनाथ थोरे, अध्यक्षपदाचे उमेदवार, क्रांतिवीर विकास पॅनल

"संस्थेत तेच-तेच लोक वर्षोनुवर्ष ठाण मांडून बसलेले आहेत. सामान्य सभासदांना येथे स्थान मिळत नसल्याने राजकीय नव्हे, तर केवळ सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे. या माध्यमातून सभासदांना नवीन पर्याय दिला. संस्थेत नवीन सभासद नोंदणी करण्याचे ध्येय आहे." - मनोज बुरकुले, अध्यक्षपदाचे उमेदवार, नवऊर्जा पॅनल

आमदार पंकजा मुंडेंकडून स्पष्टीकरण
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्यात सोशल मीडियावरून आमदार पंकजा मुंडे यांची व्हिडिओ क्लीप व्हायरल करीत पॅनलला पाठिंबा असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आमदार मुंडे यांनी लागलीच दखल घेत संस्थेतील सर्व पॅनलचे उमेदवार माझे बंधू आहेत.

चारही पॅनलमध्ये ज्येष्ठ-श्रेष्ठ उमेदवारी करीत आहेत. मी कोणत्याही पॅनलला समर्थन केलेले नाही अथवा कोणत्याही पॅनल प्रमुखाचे समर्थन करू इच्छित नाही. सर्व समाजबांधवानी खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पाडावी, असे आवाहन आमदार मुंडे यांनी प्रसारमाध्यमातून केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT