Nashik News : शासनाने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ई-हॉस्पिटल अंतर्गत ई-सुश्रुत प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या श्रेणीत ६ मोडुलचा वापर करून इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत २९ हजार ८५४ रुग्णांची तपासणी आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. (Primary Health Central)
सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामीण रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ई-सुश्रुत हा उपक्रम राबवीत आहे. ई-सुश्रुत प्रणाली अंतर्गत रुग्णालयात नवीन रुग्ण आला, की त्याला एक क्रमांक देण्यात येतो. डॉक्टर त्या रुग्णाला तपासतात. तेव्हा त्या वेळी रुग्णाच्या रेकॉर्डवर त्याचा वैद्यकीय अहवाल लिहिला जातो. पुन्हा तपासणीला येताना रुग्णाला जुना अहवाल सोबत नेणे गरजेचे नाही.
ई-सुश्रुत प्रणालीमुळे आरोग्य केंद्रांमधील कागदोपत्री होणारे कामकाज कमी होत असून, रुग्ण तसेच डॉक्टरांचाही वेळ वाचत आहे. रुग्णाच्या आजार व उपचाराची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभाग, मेडिकल स्टोअर, प्रयोगशाळेचा अहवाल, एक्स-रे, वैद्यकीय चाचण्या आदींचा त्यात समावेश आहे.
या माध्यमातून रुग्णांवर काय उपचार केले, कोणत्या वैद्यकीय चाचण्या केल्यात, त्यांचा अहवाल आदींबाबतची माहिती एका क्लिकवर डॉक्टरांना मिळत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम या कार्यक्रमांतर्गत ई-सुश्रुत प्रणाली राबविण्यात येत आहे. (latest marathi news)
रुग्ण आरोग्य केंद्रात दाखल झाल्यावर त्यास डिजिटल केसपेपर नोंदणी करून उपचार केला जातो. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने चांगल्या प्रकारे कामकाज केले आहे. या आरोग्य केंद्रात आत्तापर्यंत तब्बल २९ हजार ८५४ रुग्णांची नोंद झाली आहे.
त्यामुळे ही आरोग्य केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अभिनंदन केले असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कार्यक्रम अंमलबजावणीसाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, प्रकल्पाच्या समन्वयक लीना काळे आणि दीपाली वैद्य यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.