Students came to Adivasi Vikas Bhawan to demand the transfer of clerks and soldiers in the Government Ashram School. esakal
नाशिक

Nashik News: गृहपालच आणायला लावतात मद्याच्या बाटल्या! इगतपुरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आदिवासी आयुक्तांकडे थेट तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील गृहपाल, लिपिक, शिपाई विद्यार्थ्यांना त्रास देत असून, मद्याच्या बाटल्या व खाण्याचे पदार्थ आम्हाला आणायला लावतात, अशी तक्रार वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (ता. २) आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे केली आहे.

त्रास देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अन्यथा ९ ऑगस्टपासून उपोषणास बसण्याचा इशारा विद्यार्थ्यांना दिला आहे. दरम्यान, आदिवासी आयुक्त गुंडे यांनी तत्काळ तक्रारींची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. (Direct complaint of Igatpuri hostel students to tribal commissioner)

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आदिवासी आयुक्त गुंडे यांची भेट घेत वसतिगृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या तक्रारी मांडल्या. त्यात म्हटले आहे, की वसतिगृहातील गृहपाल श्याम बेदी, लिपिक शरद वाजे, शिपाई हेमंत खरे कार्यरत आहेत. बेदी आम्हाला दोन्ही वेळचे निकृष्ट दर्जाचे जेवण देतात, याबाबत तोंडी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.

वरिष्ठ अधिकारी वसतिगृहाला भेटीसाठी येणार असल्याने विद्यार्थ्यांना दारूच्या बाटल्या व खाण्याचे पदार्थ दमदाटी करून आणावयास लावतात. श्री. वाजे हे व्हॉट्‍सॲपद्वारे अल्कोहोल द्रव्य घेऊन या, असे सांगतात. याबाबतचा पुरावा आमच्याकडे आहे. शिपाई खरे धमकी देऊन कार्यालयातील काम करायला लावतात.

बेदी नेहमी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत दम देतात. शिवाय, ते वसतिगृहावर १५ दिवसांतून एकदाच येतात. कंत्राटी चौकीदार सचिन पारवे दमदाटी करून वसतिगृहात झाडू मारायला लावतात. या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. (latest marathi news)

संबंधितांची बदली न झाल्यास ९ ऑगस्टपासून आदिवासी आयुक्तालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. सुरेंद्र चौरे, भूषण खोरगडे, रामकृष्ण पारधी, विनोद सारूक्ते, बजरंग आवाली, सोमनाथ हिंदोळे, दिनकर हाबीर, रोहित खडके, गोरख खडके, सूरज बागारे, गौरव कातोरे, राजू पवार, रोहिदास भले, प्रवीण भोईटे, भारत जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते.

"आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भेट घेऊन तेथील गृहपालासह कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींवर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींवर कारवाई केली जाईल."- नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT