NMC esakal
नाशिक

Nashik News : अतिक्रमण उपायुक्तांकडून व्यावसायिकांना तंबी; व्यावसायिकांचे मात्र ‘पहिले पाढे पंचावन्न’

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका अतिक्रमण उपायुक्तांनी सलग दुसऱ्या दिवशी बाजारपेठेस भेट दिली. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना तंबी देत रस्त्यावर, तसेच फुटपाथवर अतिक्रमण करू नये अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबी दिली. व्यावसायिकांचे मात्र ‘पहिले पाढे पंचावन्न’, उपायुक्तांची पाठ फिरताच बाजारपेठेच्या रस्त्यांवर पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती झाली. ‘मेन रोड, शालिमार बाजारपेठ आणि अतिक्रमण’ जणू समीकरणच झाले आहे. ( warning from Deputy Commissioner of Encroachment to Professionals )

अतिक्रमण पथकाकडून रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करत पथक पुढे जात नाही तोच पुन्हा व्यावसायिकांकडून अतिक्रमण केले जात असते. त्यामुळे येथील मोहीम केवळ कुचकामी ठरत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना अतिक्रमणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याबाबत महापालिकेस अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. अतिक्रमणधारकांवर अंकुश नसल्याने या भागातील अतिक्रमण दुर्लक्षित राहिले.

अतिक्रमण उपायुक्त पदाचा नव्याने पदभार घेतलेले उपायुक्त मयूर पाटील यांनी मात्र अतिक्रमणधारकांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. आता त्यांनी शहराचे मुख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या शालिमार, मेन रोड भागातील अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला आहे. मंगळवारी (ता.२३) त्यांनी स्वतः एकटे शालिमार, मेन रोड भागात पायी फिरून अतिक्रमणधारक व्यावसायिकांना रस्त्यावर अतिक्रमण करू नये, अशा सूचना केल्या. (latest marathi news)

बुधवारी (ता. २४) सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा पोलिस पथकासह बाजारपेठेस भेट देत अतिक्रमणधारक व्यावसायिकांना तंबी दिली. रस्त्यास अडथळा ठरतील असे अतिक्रमण काढून घ्यावे, रस्त्यास अडथळा ठरेल किंवा नागरिकांना त्रास होईल असे अतिक्रमण करू नये, दुकानाच्या मर्यादेत व्यवसाय करावा अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल अशा प्रकारचा सज्जड इशारा दिला.

पाहणी करून पुढे जात नाही तोच पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झालेली दिसून आली. दोन्ही दिवशी उपायुक्तांची पाठ फिरताच व्यावसायिकांनी पुन्हा रस्त्यावर व्यवसाय थाटले. आजपर्यंत कायमस्वरूपी कारवाई होऊ शकलेली नाही. अन्य भागातील तर सोडा महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाबाहेरील अतिक्रमणदेखील हटू शकलेले नाही. त्यामुळे दोन दिवसांच्या पाहणी दौऱ्यानंतर उपायुक्त काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT