Representatives of farmers organizations and farmers from across the state making announcements at the National Kisan Parishad at the protest site of farmers in front of the district hospital. esakal
नाशिक

National Kisan Parishad:...अन्यथा छाताडावर बसून सातबारावर नावे लावू; राष्ट्रीय किसान परिषदेत इशारा

Nashik News : शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्ज मुक्ती द्यावी, जप्त जमिनी परत कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने शासन, जिल्हाधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा बँक प्रशासनाला केली होती.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा बँकेने बेकायदा शेतकऱ्यांच्या सातबारावर सोसायटी व बँकेचे नाव लावून शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून त्यांचे जगण्याचे साधन हिरावून घेतले आहे. हा सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय तसेच राज्याच्या व सहकार कायद्याविरोधात बँकेने व शासनाने केलेला गुन्हा आहे.

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या बेकायदा जप्त केलेल्या जमिनी १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, अन्यथा प्रशासनाच्या छाताडावर बसून सात बारावर नाव लावून घेईन, असा इशारा शरद जोशी विचारधन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठलराजे पवार यांनी दिला. (nashik National Kisan Parishad marathi news)

शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्ज मुक्ती द्यावी, जप्त जमिनी परत कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने शासन, जिल्हाधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा बँक प्रशासनाला केली होती. त्याविरोधात आंदोलनही सुरू होते.

या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधावे, यासाठी राज्यातील शेतकरी संघटनांकडून सोमवारी (ता.२६) जिल्हा रुग्णालयासमोर शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी परिषदेचे राज्य समन्वयक विठ्ठल राजे पवार होते. परिषदेत, शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकेकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत कैफियत मांडली. यावेळी धनंजय काकडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, भगवान बोराडे आदींनी भाषणे केली. (Latest Marathi News)

संघर्ष समितीचे कैलास बोरसे, आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष भगवान बोराडे, धनंजय पाटील, धनंजय काकडे (अमरावती), दिलीप पाटील, दिलीप गायकवाड, संजय मालोकर (अकोला), अण्णासाहेब खैरनार, बाळासाहेब वर्पे, दिलीप वर्पे पाटील, धोंडिराम थैल, आनंद शिंदे, जयराम बैरम, अशोक पाटील, अशोक देशमुख यांसह कळवण, सटाणा, दिंडोरी, निफाड, चांदवड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

संघर्ष समितीकडून मंगळवारी (ता.२७) जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी एक वाजता मोर्चा निघणार आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बोराडे, बोरसे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT