Nashik Water Crisis : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण परिसर तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे धरणात पाणी येण्यास सुरवात झाली आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ६०० दशलक्ष घनफूट पाण्याचा तुटवडा धरणात आहे. दुसरीकडे पावसानेदेखील पाठ फिरवल्याने नाशिककरांवरील जलसंकट अद्याप पावसाळ्याचा एक महिना सुरू होऊनही संपलेले नाही. (Water crisis continues in citizen )
नाशिक शहराला गंगापूर धरण व मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी गंगापूर धरणातून नाशिक शहरासाठी ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत पाण्याचे आरक्षण राहणार आहे. आरक्षित पाण्याचा विचार करतात १८ दिवसांचा पाण्याचा शॉर्टफॉल आहे. (latest marathi news)
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज होता, मात्र जून गेला तरी जुलै महिन्याच्या सुरवातीला एक, दोन दिवस पाऊस झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग चार दिवस पाऊस झाल्याने धरणामध्ये पाणी येण्यास सुरवात झाली. त्यामुळे नाशिककरांवरील जल संकट दूर होईल असे मानले गेले. मात्र, पावसाने पुन्हा एकदा ओढ दिल्याने जलसंकट कायम असल्याचे स्पष्ट झाले.
मागील वर्षाच्या तुलनेत घट
मागील वर्षी गंगापूर धरणामध्ये १६४२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा निर्माण झाला होता. या वर्षी मात्र आजच्या तारखेपर्यंत १११ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. जवळपास ६ ११ दशलक्ष घनफूट पाण्याचा तुटवडा मागील वर्षाच्या तुलनेत आहे. त्यामुळे नाशिककरांवरील जल संकट अद्यापही कायम आहे. पुढील आठ ते दहा दिवस पावसाने पुन्हा ओढ दिल्यास पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.