देवळा : पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यातील जवळपास दहा हजारांहून जास्त शेतकऱ्यांनी शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी यंदा अत्यल्प पर्जन्यमान व दुष्काळी स्थितीमुळे ६० ते ७० टक्के शेततळी कोरडी पडू लागली आहेत. कागद खराब होऊ नये म्हणून विकतचे पाणी आणून या शेततळ्यात टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ज्या शेततळ्याच्या भरवशावर दरवर्षी डाळिंबाचा मृगबहार धरला जायचा त्याला मर्यादा पडल्या आहेत. (Nashik Groundwater storage depletion fat deola marathi news)
गेल्या सात-आठ वर्षांत काही शेतकऱ्यांनी अनुदानाचा आधार घेत तर काहींनी स्वखर्चातून छोटी-मोठी शेततळी बांधली. शासनानेही कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन व्हावे, यासाठी शेततळ्याचे महत्व जाणून घेत ‘सर्वांसाठी शेततळे’, ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून प्रतिसाद दिला.
या योजनेच्या किचकट अटी- शर्थी पूर्ण करत शेतकऱ्यांनी शेततळी बांधली खरी; परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेततळे भरून पाहण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. येथील कसमादेसह चांदवड, नांदगाव, येवला भागात यावर्षी कमी पाऊस झाल्याने नदी-नाले भरून वाहिलेच नाहीत.
यामुळे शेततळी कोरडी राहिली. तर विहिरींनाही पाणी उतरले नाही. शेततळ्यांसाठी वापरला जाणारा महागडा कागद उन्हापासून खराब होऊ नये म्हणून विकतचे पाणी आणून शेततळ्यात टाकावे लागत आहे. (Latest Marathi News)
शेततळ्यांच्या कामाला ब्रेक
यावर्षी शेतमालाला कमी भाव व पावसाचे अत्यल्प प्रमाण, फळबाग लागवड कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये शेततळी बांधण्याबाबत उदासीनता असल्याने यंदा शेततळी बांधणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. त्यात बहुतेक शेतकऱ्यांकडे जमिनीचे कमी क्षेत्र असल्याने आणि नाही म्हटले तरी २०-२५ गुंठे जमिन शेततळ्यासाठी गुंतवावी लागत असल्याने शेततळ्यांच्या कामाला तसा ब्रेक लागला आहे.
"रब्बी हंगाम काढता यावा व डाळिंबाला योग्यवेळी पाणी देता यावे, यासाठी मोठ्या मेहनतीने शेततळे बांधले. परंतु, आमच्या भागातील दुष्काळाचा कलंक काही केल्या जात नाही. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने नदी-नाले कोरडीच राहिली. त्यामुळे शेततळी भरणे शक्य झाले नाही. मोठे सिंचन प्रकल्प न झाल्याने दुष्काळ कायम आहे."- सुपा सोनवणे, दहिवड (ता.देवळा)
"पर्जन्यमान कमी झाल्याने शेततळ्यात पाणी टाकणे अवघड झाले आहे. यामुळे नाईलाजास्तव डाळिंबाची बाग काढून टाकावी लागली."- किरण भामरे, खुंटेवाडी (ता. देवळा)
"शेततळ्यातील कागद खराब होऊ नये व डाळिंब पीक जगावे म्हणून विकतचे पाणी टँकरने आणून शेततळे भरण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण, अवघड आहे."
- हरिष निकम, श्रीरामपूर (ता. देवळा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.