Nashik Water Crisis esakal
नाशिक

Nashik Water Crisis: जुलैच्या मध्याला 15 जिल्ह्यातील 1300 गावे अन वाड्या तहानलेल्या!

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Crisis : राज्यातील १५ जिल्ह्यातील ३३५ गावे आणि ९८५ वाड्या पुरेशा पावसाअभावी जुलैच्या मध्याला तहानलेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रासह पश्‍चिम महाराष्ट्रात टंचाईच्या झळा अधिक आहेत.

गेल्यावर्षी याच काळात राज्यातील ७७ गावे आणि १७० वाड्यांसाठी ७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच राज्यात आतापर्यंत ७५.७ टक्के पाऊस झाला असला, तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत ५७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. (Nashik Water Crisis middle of July 1300 villages and mansions in 15 districts thirsty Scarcity in North and West Maharashtra)

धरणांमध्ये २६.९६ टक्के कमी जलसाठा राज्यात उपलब्ध आहे. राज्यातील मोठ्या, मध्यम, लघू अशा एकूण २ हजार ९९० धरणांमध्ये आज सकाळपर्यंत ३२.२३ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्यावर्षी ५९.१९ टक्के जलसाठा झाला होता.

विभागनिहाय धरणांची संख्या आणि त्यातील जलसाठ्याची टक्केवारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्यावर्षीच्या जलसाठ्याची टक्केवारी दर्शवते) : नागपूर-३८३-४९.०८ (५६.६६), अमरावती-२५९-४२.८९ (५८.४१), औरंगाबाद-९२०-२४.८२ (५०.९०), नाशिक-५३५-३१.९० (५६.७१), पुणे-७२०-२२.४९ (५२.३५), कोकण-१७३-५६.६५ (८०.१३). तसेच विभागनिहाय आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी आणि गेल्यावर्षीची त्या विभागातील पावसाची टक्केवारी अनुक्रमे याप्रमाणे : कोकण-८८.२-१२०.५, नाशिक-६८.६-१२४.५, पुणे-४१.८-९६.८, औरंगाबाद-६९.१-१६३, अमरावती-७५.६-१२७.१, नागपूर-८७.५-१५४.४.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक, नगर, सातारामध्ये सर्वाधिक टँकर

राज्यातील सर्वाधिक टँकर सुरु असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक, नगर, साताराचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील ६८ गावे आणि ३७ वाड्यांसाठी ५८ टँकर धावताहेत. मागील आठवड्यात जिल्ह्यातील ६७ गावे आणि ३६ वाड्यांसाठी ५३ टँकर सुरु होते.

सातारा जिल्ह्यातील ५६ गावे व २७३ वाड्यांसाठी ५४, तर नगर जिल्ह्यातील ५८ गावे आणि ३२६ वाड्यांसाठी ५३ टँकर सुरु आहेत.

इतर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात त्या जिल्ह्यात सुरु असलेल्या टँकरची संख्या दर्शवते) : धुळे-१-० (१), नंदूरबार-१-२ (२), जळगाव-३३-० (३५), पुणे-४४-२२८ (३२), सांगली-७-३१ (७), सोलापूर-८-८८ (९), औरंगाबाद-२४-० (२२), हिंगोली-८-० (९), नांदेड-१-० (२), अमरावती-५-० (५), वाशिम-१-० (१), बुलडाणा-१९-० (१९). सध्या कोकण आणि नागपूर विभागात एकही टँकर सुरु नाही.

विभागनिहाय टँकरची स्थिती

विभागाचे नाव टंचाईग्रस्त टँकरची संख्या

गावे वाड्या

नाशिक १६१ ३६५ १४९

पुणे ११६ ६२० १०२

औरंगाबाद ३३ ० ३३

अमरावती २५ ० २५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajan Teli: राजन तेली आमचेच! दिशाभूल झालेले अनेक जण परतणार; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

Direct Tax: मोदी सरकारच्या दहा वर्षांत प्रत्यक्ष कर संकलन 182 टक्क्यांनी वाढले; महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, गुजरात कुठे?

Ola Electric : ओला इलेक्ट्रिककडून नवीन बॉस ऑफर्सची घोषणा, एस१ पोर्टफोलिओवर जवळपास २०,००० रूपयांची सूट आणि २५,००० रूपयांचे अतिरिक्‍त फायदे

IND vs NZ 1st Test : Virat Kohli चा भीमपराक्रम! गाजवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट अन् कसोटीत विक्रमी झेप

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

SCROLL FOR NEXT