Water Crisis esakal
नाशिक

Nashik Water Crisis: पिंपळगावकरांनो, पाणी जपून वापरा! पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची पातळी खालावली

Water Scarcity : पिंपळगावकरांची तहान भागविणाऱ्या पालखेड धरणासह ओझरखेड, करंजवण प्रकल्पातील जलसाठ्यात गत वर्षीच्या तुलनेत मोठी घट दिसते आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पिंपळगावकरांची तहान भागविणाऱ्या पालखेड धरणासह ओझरखेड, करंजवण प्रकल्पातील जलसाठ्यात गत वर्षीच्या तुलनेत मोठी घट दिसते आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिंपळगाव शहराला पाणीटंचाईला (Water Scarcity) सामोरे जाण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास संभाव्य संकटावर मात करता येऊ शकते. त्यामुळे पिंपळगावकरांनो, पाणी जपून वापरा, असा संदेश ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे. (Nashik Water Crisis Pimpalgaon water supply dam dropped marathi news)

दर वर्षी पिंपळगाव बसवंत शहराला उन्हाळ्यात पाण्याची टंचाई फारशी जाणवत नाही; पण शहरातील वाढत्या नागरिकरणामुळे तब्बल चार हजार नळजोडणी झाल्या आहेत. शहरात पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने सध्याच शहराची तहान भागविताना ग्रामपंचायत प्रशासनाची कसरत होते आहे. आता उन्हाळा उंबरठ्यावर आहे.

त्यातच धरण प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये गत वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. पालखेडमध्ये ३० टक्केच जलसाठा आहे. ओझरखेडमध्ये ४४ टक्के, तर करंजवणमध्ये ४७ टक्के जलसाठा असल्याने कधीही तळ गाठू शकतो. अशा परिस्थितीत भविष्यात पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनांमुळे उन्हाळ्यातही पिंपळगाव शहर ओलेचिंब असायचे. यंदा मात्र आडात नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार, अशी स्थिती उद्‍भवू शकते. त्यामुळे पिंपळगावकरांची चिंता वाढणार आहे. धरणातील जलसाठ्याची स्थिती पुढील तीन महिन्यांत अधिकच नाजूक होणार आहे.

मार्च, एप्रिल, मे असे कडकडीत उन्हाचे तीन महिने शिल्लक असल्याने स्थिती गंभीर होण्याची चिन्ह आहे. भविष्यातील पाणीटंचाईच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी पिंपळगावकरांना आतापासूनच आवश्‍यक काळजी घ्यावी लागणार आहे. आगामी दिवसांमध्ये पाण्याचे योग्य नियोजन व काटकसरीने वापर केला तरच उन्हाळ्यात पिंपळगावकरांची तहान भागू शकते. (Latest Marathi News)

संभाव्य पाणीटंचाईवर काही उपाययोजना

- पाण्याचा गैरवापर टाळावा

- पाण्याचा पुनर्वापर करावा,

- अंघोळीला शॉवरचा वापर न करता बादलीचा वापर करावा

- नळाच्या पाण्याद्वारे गाड्या धुणे टाळावे

- नळगळती असेल तर ग्रामपंचायत प्रशासनाला कळवा

- पाणीबचतीची सवय करा

"पिंपळगाव शहराला पाणीपुरवठ्याची भिस्त असलेल्या पालखेड धरणासह इतर प्रकल्पांतही जलसाठा पातळी घटली आहे. ही बाब चिंताजनक आहे. पावसाळ्यापर्यंत नागरिकांना जपून पाणी वापरावे लागेल. धरणातून जलशुद्धीकरण केंद्रात मुबलक पाणीपुरवठा न झाल्यास पाणीकपातीचे धोरण स्वीकारावे लागेल."- भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : छगन भुजबळ यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT