नांदगाव : तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे संकट भीषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. १९) तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी थेट धडक कारवाई करीत माणिकपुंज धरणावर असलेल्या बेकायदेशीर पाण्याचा उपसा करणाऱ्या आठ मोटारी जप्त केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Nashik Pipeline in Manikpunj dam marathi news)
पंचायत समिती आवारात आढावा बैठकीला उपस्थित तलाठी, ग्रामसेवकांचा ताफा सोबत घेऊन तहसिलदारांनी थेट माणिकपूंज धरण गाठले. त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, महाविरणचे बाणगाव उपविभागीय अभियंता श्री. पाटील, पाटबंधारे विभागाचे श्री. शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, धरणावरील कर्मचाऱ्यांचा होता.
अचानक शासकीय वाहनांचा मोठा ताफा धरणस्थळावर आल्याने मोठी धांदल उडाली. धरणावरील पाणी पिण्यासाठी आरक्षित असून त्याचा अवैध उपसा होऊ नये, असे आदेश सप्टेंबर महिन्यात काढण्यात आले होते. त्यावेळी धरणाच्या पूर्व भागातील रोहित्र बंद करण्यात आली होती.
मात्र, पश्चिमेच्या बाजूने असलेल्या भागात दोनशेहून अधिक उपसा करणाऱ्या मोटारी व पाइपलाइनचे जाळे जैसे थे होते. ऑक्टोबर महिन्यात धरणक्षेत्रात पाऊस पडल्याने एकूण २७५ दशलक्ष घनफूट एवढा जलाशयाचा साठा शिल्लक होता.
त्यात दिवसेंदिवस घट होत तो दोनशे दशलक्ष घनफूटपर्यंत आला. जलाशयाची पातळी घसरल्याने टंचाईकाळात पाणी जूनपर्यंत पुरविण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे राहिले होते. तहसीलदार सुनील सैंदाणे एक महिन्यापूर्वी नांदगावी रुजू झाले अन् त्यांनी टंचाईच्या मुकाबल्यासाठी पाऊल उचलले. . (latest marathi news)
कारवाई सुरुच राहणार
दिवसभरात विद्युतपंप, पाईपलाईन जप्तीच्या कारवाईचा धसका घेत अनेकांनी स्वतःहून उपसा पंप काढून घेतले. धरणाच्या मध्यक्षेत्रात विद्युतपंप टाकले असल्याने ते काढण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. धरणाच्या किनाऱ्यावरील पाइपलाइनचे मोठे जाळे तोडून टाकण्यात आले. यापुढेही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याची समज देण्यात आली.
माणिकपुंज धरणातील उपयुक्त असलेला पन्नास दशलक्ष घनफुट जलसाठा सुरक्षित राहिला आहे. मात्र, वाढता उन्हाळा, बाष्पीभवनातून कमी होणाऱ्या पाणीपातळीचा अपवाद वगळता उर्वरित जलसाठा जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरविण्याचे आव्हान मात्र कायम आहे.
"सध्या तालुक्यात ४७ गावे व २२२ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तालुक्यातील जलसाठा असलेले माणिकपुंज धरण एकमेव असल्याने यापुढे अवैध उपसा होणार नाही, यासाठी आजची कारवाई करण्यात आली आहे. ९ मोटारी व अन्य सामग्री जप्त करण्यात येऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे."- सुनील सैंदाणे, तहसीलदार, नांदगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.