dry well file photo esakal
नाशिक

Nashik Water Crisis: रब्बीची चिंता, शेतकरी हवालदील! ऑक्टोबर हीट व दुष्काळाची तीव्रतेमुळे विहिरींनी गाठला तळ

सकाळ वृत्तसेवा

वडेल : तालुक्यासह जंगलांनी समृद्ध असलेल्या काटवन परिसरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. ऑक्टोबर हीट व दुष्काळाची तीव्रता यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

परतीचा पाऊसही न झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला असतानाच रब्बीच्या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. लाल कांद्याची लगबग सुरू असताना काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी त्याकडे पाठ फिरविली. (Nashik Water Crisis Rabi Concern Farmer troubled wells bottomed out due to October heat and severity of drought)

शेतात काम नाही. शेतमजूरही त्रस्त झाले आहेत. सकाळी अकरानंतरच उन्हाचा पारा वाढत असल्याने रस्तावर ये-जा करताना शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. शहरात काही प्रमाणात रेलचेल व दळणवळण आहे.

ग्रामीण भागात बिकट स्थिती असून, उद्योग, व्यवसायांवरही त्याचा परिणाम झाला आहे. अत्यल्प पावसाने शेती करणे जिकरीचे झाले आहे.

अखेरच्या टप्प्यातील पावसाने चारा व पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरी शेतकरी नवरात्रोत्सवात रब्बी हंगामासाठी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या वर्षी खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला.

गेल्या आठवड्यापासून उष्णता वाढली असून, वातावरणात दररोज बदल होत आहेत. सायंकाळी पाच‌ ते सहाच्या सुमारासही उन्हाचा चटका जाणवत आहे. तापमानातील चढ-उतारामुळे आरोग्यावर परिणाम जाणवत आहे.

ऑक्टोबर सुरू झाल्यापासून पावसाने दडी मारली आहे. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे तात्पुरती तहान भागली गेली. विहिरींच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्येच विहिरींनी तळ गाठायला सुरवात केल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे.

शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता रब्बी हंगामाच्या आशा परतीच्या पावसावर अवलंबून आहेत. यासाठी शेतकरी सप्तशृंगीला साकडे घालत आहेत. नवरात्रोत्सवात तरी जोरदार पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT