Archive photo of Darna Dam esakal
नाशिक

Nashik Water Crisis: धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट! दारणा 43 तर भावलीत 32 टक्के पाणीसाठा

Water Shortage : इगतपुरी तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भावली धरणात तर अवघा ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आगामी काळात इगतपुरी तालुक्यासाठी ही चिंतेची व काळजीची बाब ठरणार आहे.

विजय पगारे

इगतपुरी : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात सात मोठी धरणे असून या धरणांच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या भागाला पाणीपुरवठा होतो. ऑक्टोबर २०२३ अखेर इगतपुरी तालुक्यातील या सातही प्रकल्पात जवळपास १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. मात्र साडेतीन महिन्याच्या कालावधीत आरक्षित पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला.

आजच्या स्थितीला दारणा,मुकणे सारख्या धरणात अवघा ४३ टक्के साठा शिल्लक दिसतो. तर इगतपुरी तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भावली धरणात तर अवघा ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आगामी काळात इगतपुरी तालुक्यासाठी ही चिंतेची व काळजीची बाब ठरणार आहे. (Nashik Water Crisis Rapid decline in water storage in dam marathi news

यावर्षी ३१ ऑक्टोबर २०२३ अखेर तालुक्यातील दारणा, भाम, भावली, कडवा ही प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. तर मुकणे धरणात ९५ टक्के तर वाकी धरणात ९० टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. मात्र अवघ्या साडेतीन महिन्यात सर्वच धरणातून विसर्ग झाल्याने धरणातील जलसाठा निम्याहून खाली आला आहे. त्यात जिल्ह्यात सर्वात प्रथम भरणाऱ्या भावली धरणात ३३ टक्के साठा शिल्लक आहे.

२०२२ मध्ये राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतांश धरणे भरली होती. त्यात मराठवाडा येथील जायकवाडी धरणही पूर्ण क्षमतेने भरून वाहत होते. त्यामुळे शासन धोरणानुसार इगतपुरी तालुक्यातील दारणा समूहातून पाण्याचा विसर्ग झाला नव्हता.

मात्र, यावर्षीच्या २०२३ च्या हंगामात राज्यात बहुतांश भागात पावसाचे प्रमाण घटल्याने धरणातही पुरेसा साठा झाला नसल्याने विशेषतः मराठवाड्यात ही स्थिती निर्माण झाली .त्यामुळे जायकवाडी धरणात ६५ टक्के पेक्षा कमी साठा असल्याने जलसंपदा विभागाने नाशिक जिल्ह्यातील गोदावरी व दारणा समूहातून जायकवाडीकडे पाण्याचा विसर्ग केल्याने इगतपुरी तालुक्यातील जलसाठा कमी झाला आहे. (Latest Marathi News)

आगामी काळ कसोटीचा

फेब्रुवारी अखेरपर्यत गतवर्षी इगतपुरी तालुक्यातील धरणांमध्ये सर्वसाधारणपणे साठ टक्केच्या आसपास जलसाठा शिल्लक होता. मात्र यावर्षी फेब्रुवारी अखेर दारणा धरणात निम्माहून कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने पाणीसाठा कमी झाल्याने तालुक्यातील पाणीपुरवठा योजना, शेती, सिंचनासाठी भविष्यात पाण्याचे नियोजन करावे लागेल घटलेला पाणीसाठा ही इगतपुरी तालुक्याला आगामी काळातील चार महिन्यासाठी पाण्यासाठी ‘डोळ्यात पाणी’ आणण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

२३ फेब्रुवारी २०२४ अखेर स्थिती (टक्केमध्ये)

धरणाचे नाव | २० फेब्रुवारी २०२३ | २० फेब्रुवारी २०२४

दारणा ७८ ४३

मुकणे ८३ ४४

वाकी ५६ ५१

भाम ६४ ५१

भावली ८५ ३३

कडवा ४६ ३४

वालदेवी ७२ ८४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

बुरखा घातल्याने 'मोदीं'च्या सभेत प्रवेश नाकारला; मुस्लीम महिलांनी घेतली आक्रमक भूमिका, शिवाजी पार्कवर काय घडलं?

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

SCROLL FOR NEXT