Women filling muddy water  esakal
नाशिक

Nashik Water Crisis : शेणवड बुद्रुकच्या ‘जलजीवन’चे तीनतेरा! आदिवासी महिलांना भरावे लागतेय झिऱ्यातील गढूळ पाणी

Water Crisis : वर्ष उलटूनही या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट काही थांबण्याचे नाव घेत नाही

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : तालुक्यातील शेणवड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १२ आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना थेट घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत गेल्यावर्षी १ कोटी ६६ लाख रुपये निधी मंजूर झाला. मागीलवर्षी काम सुरू झाले. मात्र, वर्ष उलटूनही या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट काही थांबण्याचे नाव घेत नाही. (Nashik Water Crisis Shenwad Budruk Jal Jeevan in trouble news)

शेणवड बु॥ गाव व शिवाचीवाडी, खडकवाडी, खाल्ली वाडी, लालवाडी, पारधवाडी, पाटीलवाडी, फणसवाडी, बुडानवाडी, सावरवाडी, पेहेरेवाडी, माऊलीवाडी या १२ वाड्या पेसाअंतर्गत आहेत. योजनेबद्दल माहिती विचारली तर ठेकेदार दमबाजी करीत असल्याची तक्रार येथील सरपंचांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेकडे केली आहे.

परिषदेने ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी केली असता या योजनेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून आले. साधारण वर्षभरापूर्वी ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशनच्या कामाची पूर्तता झाली. मात्र, डोंगरमाथ्यावर टाकी बांधून पाईपलाईन टाकून ठेकेदार गायब झाल्याचे दिसून आले. येथील वाड्यापाड्यातील घरात मात्र अजूनही नळजोडणी केलेली नाही.

ग्रामपंचायत हद्दीतील १२ वाड्यांमधील आदिवासी महिलांना आपल्या चिमुकल्यांसह चक्क झिऱ्याचे गढूळ पाणी हाताच्या ओंजळीने भरून तहान भागविण्याची वेळ आली आहे. थोडक्यात काय तर धरणांचा तालुका, पावसाचे माहेरघर असलेल्या तालुक्यात महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरण्याचे नाव घेत नाही.

याला कारणीभूत कोण संबंधित लोकप्रतिनिधींची उदासीनता की ठेकेदारांचा मनमानी कारभार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. सरपंचालाच पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आल्याचे लाजीरवाणे चित्र आहे. योजना अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेणवड बुद्रुकच्या सरपंच कलावती खडके, शिवराम खडके, दत्तू ठाकरे, हिरामण गांगड, राजू पारधी, दिनेश खडके, अंकुश गाव्हांडे, सोमू खडके यांनी केली आहे. (latest marathi news)

निधी गेला कुठे?

इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत जवळपास शंभर कोठी रुपयांची जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामे सुरू असून, निम्याच्या वर या योजना अपूर्णावस्थेत आहे. ठेकेदारांना मात्र शंभर टक्के निधी वितरीत केल्याची माहिती मिळत आहे. योजना अपूर्ण ठेवून जर तालुक्यातील आदिवासी बांधवांना पाणी मिळाले नाही तर मुंबईला जाणारे पाणी बंद करू, असा आक्रमक पवित्रा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने घेतला आहे.

"शेणवड बुद्रुक येथे जलजीवन योजनेचे काम करताना संबंधित ठेकेदाराने थेट नदीत विहिरीचे काम केले आहे. नदीतील विहिरीतून एकदा पाणीउपसा केल्यावर पुन्हा विहिरीत लवकर पाणी जमा होत नाही. तसेच, विहिरीपासून पाण्याची टाकी थेट पाच किमी अंतरावर असलेल्या उंच डोंगरावर बांधलेली आहे. अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी शासनाकडे करणार आहे."- लकी जाधव, प्रदेश उपाध्यक्ष, आदिवासी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT