A queue of tankers to fetch water esakal
नाशिक

Nashik Water Crisis: टॅंकरने पाणी आणत पीके वाचविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Crisis : देवळा तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळामुळे पाणीटंचाईचे सावट स्पष्ट दिसू लागले आहे. खरीप हंगामातील पिके डोळ्यांदेखत करपत असली तरी महागड्या पिकांना वाचवण्यासाठी टँकरने पाणी पुरवण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकरी बांधव करत आहेत.

गेल्या दोन अडीच महिन्यांपासून पावसाचा पत्ता नसल्याने या भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्यासाठी, जनावरांसाठी तसेच फळबागांसाठी टॅंकरने पाणी आणले जात आहे. (Nashik Water Crisis Trying to save crops by bringing water with tankers)

मेशी शिवारातील पाटाजवळील काही विहिरींना पाणी असल्याने तेथून टँकर भरून विहिरीत, शेततळ्यात तसेच टाक्यांमध्ये टाकत व तेच पाणी पुरवून वापरणे अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

यामुळे या भागातील रस्त्यांवर टँकरची वाहतूक वाढली आहे. या टँकरच्या पाण्याचा वापर करून प्राधान्याने कांद्याचे रोप, डाळिंबबागा, भाजीपाला, कांदे जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. आज ना उद्या पाऊस येईल यावर शेतकऱ्यांचा पाण्यावरचा खर्च वाढला आहे.

देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील परसूल धरण अनेक गावांची तहान भागवते. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा त्यातील साठा संपत आला आहे. त्यामुळे येथील पाणीपुरवठा योजना पुढील काळात संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ठिकाणाहून दहिवडच्या दोन, रामनगरची एक, उमराणेच्या दोन, महात्मा फुलेनगर, तिसगाव, सांगवी, कुंभार्डे मेशी या गावांच्या लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनांसाठी विहिरी करण्यात आलेल्या आहेत.

परंतु आज त्या विहिरींचे पाणी कमी झाल्यामुळे या गावांनी एक-एक, दोन-दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे.

यासाठी चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी परसूल धरणापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चाराछावण्या उभारण्यात याव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Economist Bibek Debroy Passed Away: अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन; ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष होते

आताच्या दिवाळीत जुनी मजा नाहीच... कुणाला गावी जायची घाई तर कुणाला फटाके उडवायची, कलाकारांनी सांगितल्या आठवणी

Tesla Job: पुण्याच्या इंजिनियरने इलॉन मस्कला पाठवले 300 अर्ज आणि 500 ​​ईमेल; शेअर केला ड्रीम जॉब मिळवण्याचा संघर्ष

Diwali Festival 2024 : नरक चतुर्दशीनिमित्त घरोघर अभ्यंगस्नान; आज लक्ष्मीपूजन

Mumbadevi Assembly Constituency: ''इम्पोर्टेड माल नको, आमचा ओरिजनल माल आहे'' अरविंद सावंतांची जीभ घसरली; शायना एनसींचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT