Watermelon, Melon crops in the fields here and dried vines and fruits. esakal
नाशिक

Nashik Water Crisis : खामखेड्यात पाण्याअभावी टरबूज पीक धोक्यात! पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

Nashik News : रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेऊन कसमादेतील बहुतांशी शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली.

सकाळ वृत्तसेवा

खामखेडा : रमजान पर्व व उन्हाळा लक्षात घेऊन कसमादेतील बहुतांशी शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली. परंतु पंधरा दिवसांपासून बदलेले हवामान, विहिरीच्या पाण्याच्या पातळीत झालेली घट. यामुळे या पिकाला मुबलक पाणी न मिळाल्याने (Water Crisis) अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज, खरबूज पिकांचे वेल वाळून फळाला चटका बसू लागल्याने फळ खराब होवू लागली आहेत. (Nashik Water Crisis Watermelon crop in danger in Khamkheda news)

उन्हाळ्यात भाव मिळेल, या अपेक्षेने कसमादे भागातील खामखेडा, सावकी, भादवन, पीळकोस, डांगसौंदाणे, कळवण तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांश शेतकरी दरवर्षी टरबुजाची लागवड करतात. मात्र यावर्षी मागील १५ दिवसापासून विहिरींच्या पाण्याच्या पातळीत उष्णतेमुळे घट झाल्याने टरबूजाला पाणी कमी पडू लागले आहे. त्याचबरोबर करपा रोगामुळे मोठ्या प्रमाणावर पीक बाधित होऊ लागले आहे.

टरबुजाची लागवड केल्यानंतर साठ ते सत्तर दिवसांत हे पीक येते. पिकाची फळ धारणा झाल्यानंतर चाळीस दिवसाच्या पुढील पिकास पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज असते. मात्र सध्या पन्नास ते साठ दिवसाच्या या पिकाला पाण्याची अधिकची गरज असताना पाणी कमी पडू लागल्याने तसेच पिकावर करपा व डावण्या आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या या पिकाचे वेल सुकून फळ उघडी पडू लागली आहेत.  (latest marathi news)

त्यामुळे फळांची वाढ देखील खुंटली आहे. उन्हाची वाढलेली तीव्रता व फळ उघडी पडू लागल्याने तयार होण्याच्या टप्प्यात फळ वरच्या बाजूने खराब होऊन फळावर उन्हाच्या चटक्याने डाग दिसू लागले आहेत. टरबूज सोबतच खामखेडा भागातील अनेक शेतकरी खरबूज पिकाचे देखील लागवड करतात. खरबूज पिकाचे देखील हीच अवस्था असून काढणीला आलेल्या खरबूज पिकातील वेल देखील वाळल्याने पिकाचे नुकसान होत आहे.

"मार्च महिन्यात रमजान सणामुळे टरबूज व खरबूज पिकाला चांगली मागणी राहील म्हणून लागवड केली. मात्र ऐन पीक तयार होण्याच्या टप्प्यात विहिरींची पाणी कमी पडल्याने तसेच पिकावर करपा रोग आल्याने खर्च देखील निघणार नाही."

- हेमंत मोरे, शेतकरी खामखेडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT