चांदवड : यंदाच्या पावसाळ्यात चांदवड तालुक्यासह जिल्यातच कमी पाऊस झाला असल्याने टंचाईची दाहकता वाढत आहे. त्यामुळे यावर्षी सुरवातीपासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. विहिरींसह कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.सद्यःस्थितीत तालुक्यातील २४ गावे आणि ४१ वाड्यांना २५ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. या महिन्यात नव्याने काही गावे व वाड्या वस्त्यांचे प्रस्ताव आले असून या गावांना पाणी पुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. (Nashik Water Crisis With increasing heat problem Chandwad taluka)
टँकरने पाणीपुरवठा होत असला तरीही काही ठिकाणी लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. एप्रिलच्या सुरवातीलाच ही परिस्थिती आहे. मे महिना आणखी तापदायक ठरणार आहे. ज्या गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तिथे तो पुरेसा प्रमाणात केला जात नाही. मंजूर असलेल्या खेपा होत नाहीत तर कधीकधी एकही खेप होत नाही. त्यामुळे पाणीटंचाईत नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी ते संकट अधिकच वाढते. परिणामी विकतचे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे.
उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असताना पाणीटंचाईची स्थिती भयावह झाली आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे. चांदवडच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाईने वाड्या पाड्यावरील वस्तीवरील जनजीवन विस्कळित झाले आहे. पाण्याचे कुठलेही शाश्वत स्रोत उपलब्ध नसल्याने पाणीटंचाईच्या झळा येथील नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.
पूर्व भागातील गावांना तर पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी कोणतीही खास व्यवस्था नाही. एकीकडे विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे मात्र आज ही पिण्याच्या पाण्याची किती भीषण अवस्था आहे हे यावरून दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. (latest marathi news)
पाणीच नसताना योजनांवर खर्च
पूर्व भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईला जबाबदार अधिकारी व नेते आहेत. पूर्व भागासह तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत पाणीपुरवठा योजना असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाणी उपलब्ध नाही, मग या योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केलेच कशासाठी?
पाणी उपलब्ध नसताना पाणी योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करून लोकप्रतिनिधी, अधिकारी व ठेकेदारांनी टाळू वरचे लोणी खाल्लं आहे अन् आता या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.