Water entering the ration shop in HUDCO area and wet ration grains. Rainwater on DJ Road. esakal
नाशिक

Nashik Rain Damage : रेशन दुकानात पाणी घुसून रेशन धान्य भिजले; येवल्यात दीड तास मुसळधार पाउस

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Damage : यंदाच्या हंगामात प्रथमच आज येवला शहरात सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी करून जनजीवन विस्कळीत केले. हुडको भागात रेशन दुकानात पाणी घुसून वाटपाला आलेले धान्य भिजले. अनेक घरातही आणि घुसून मोठे नुकसान झाले. शहरात मात्र मागील दोन वर्षात प्रथमच असा धुवाधार पाऊस शहरवासीयांनी अनुभवला. शहर परिसरातच धोधोपणे कोसळणाऱ्या पावसाने ग्रामीण भागातील अनेक गावे मात्र वंचित ठेवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. (Water enters ration shop and damage ratio grains in yeola )

मुसळधार पावसाने हुडको वसाहत,कानडी गल्ली,फत्तेबुरुज नाका, विंचूर चौफुली,शनी पटांगण,येवला बसस्थानक,स्वामी मुक्तांनद विद्यालयाचे क्रीडांगण,कोर्ट रोड आदी भागात गुडघ्यावर पाणी साचले होते.शहरातील सर्वच रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.विंचूर चौफूली, फत्तेबुरुज नाका,कापड बाजार,मेन रोड,जुने तहसील कार्यालय आदींसह विविध भागात पावसाचे तळे साचले होते.

रस्ते बंद

फत्तेबुरुज नाक्यावर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा परिसर ते पारेगाव रोड पर्यंत तळे साचून रस्ता बंद झाल्याचे चित्र आजही दिसले. अशीच परिस्थिती परेगाव रोडवर डॉ. काकड हॉस्पिटलच्या पुढे दिसली. या ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने पाण्याचे तळे भर रस्त्यात तयार झाले होते. (latest marathi news)

धान्य भिजले

हुडको वसाहतीत काही घरामध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली.हुडको वसाहतीतील किशोर सोनवणे यांच्या रेशन दुकानात पाणी शिरल्याने वाटपासाठी आलेले सर्व धान्य, गहू - तांदूळ भिजले असून ओले झाल्याने नुकसान झाले.विशेष आज मंगळवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने सर्वच विक्रेते व खरेदीदार यांनाही या पावसाचा फटका बसला.

दुपारी तीनच्या सुमारास शहरात पावसाचे आगमन झाले. आज सुमारे ५०-५५ मिलीमीटर पाऊस पडल्याचा अंदाज आहे. शहरात पडणाऱ्या पावसाने पाणीपाणी केले पण ग्रामीण भागातून मात्र या पावसाची मोठी प्रतीक्षा उशिरापर्यंत सुरू होती.काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पडल्याचे सांगण्यात आले

नालेसफाई हा पब्लिसिटी स्टंट

''आजच्या पावसाने मेन रोडसह डीजे रोड व सर्वत्र गुडघाभर पाणी साचले व वाहताना दिसले.अनेक भागात घरातही पाणी घुसल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. कुठे पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा न झाल्याने या प्रकाराला नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे.अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.नालेसफाई करताना काळजीपूर्वक केली जात नाही.नालेसफाई हा उपक्रम फक्त माध्यमात झळकण्यासाठीचा पब्लिसिटी स्टंट आहे.''- अविनाश कुक्कर (माजी नगरसेवक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT