smart city project  esakal
नाशिक

Nashik Water Management : प्रत्येक थेंबाचा लागणार अचूक हिशोब; शहरात 7 हजार स्काडा मीटर कार्यान्वित

Water Management : स्मार्टसिटी कंपनीकडून स्काडा मीटर बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आतापर्यंत ७ हजार मीटर बसवून कार्यान्वित करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Management : शहरात पाणीपुरवठा होणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा हिशोब लावण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीकडून स्काडा मीटर बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, आतापर्यंत ७ हजार मीटर बसवून कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली. शहरात २ लाख ९ हजार नळजोडणी आहे. यात व्यावसायिक नळजोडणी धारकांची संख्या २५ हजार १३४ आहे. (nashik water management 7 thousand Scada meters are operational in city by smart city company marathi news)

निवासी पाणीपट्टीच्या तुलनेत व्यावसायिक कारणांसाठी पाण्याचा वापर करणाऱ्यांना अधिक म्हणजे चारपट अधिक दर लावला जातो. मात्र या सर्व पंचवीस हजार ग्राहकांकडून शंभर टक्के पाणीपट्टीची वसुली होत नाही. पाणीपट्टीची देयके देण्यासाठी मनुष्यबळ नसणे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे स्मार्टसिटीच्या माध्यमातून गावठाण भागात स्काडा प्रणालीचे स्मार्ट वॉटर मीटर बसविले जात आहे.

प्रायोगिक तत्त्वावर जवळपास ७४४७ स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याचे नियोजन आहे. त्यातील ७ हजार मीटर कार्यान्वित झाले आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी मिशनअंतर्गत हा प्रकल्प राबविला जात आहे. वाढत्या पाण्याच्या मागणीची पूर्तता आणि भविष्यातील संभाव्य पाण्याच्या संकटाशी सामना करण्यासाठी स्मार्टसिटीने आपल्या रहिवाशांना सतत पाणीपुरवठा करता येईल याची खात्री करण्यासाठी पाणी वितरण प्रकल्प सुरू केला आहे.

त्या अंतर्गत व्यावसायिक नळजोडणी असलेल्या ग्राहकांच्या मीटरचे ऑटोमॅटिक मोबाईल रीडिंग या तंत्राच्या साह्याने रीडिंग घेऊन ग्राहकांच्या मोबाईलवर बिल दिले जाणार आहे. मॅन्युअल मीटर रीडिंग पद्धती कमी करणे, मीटर रीडिंगमधील विसंगती कमी करणे, बिलिंगची कार्यक्षमता वाढवणे, पाण्याच्या वापरासंबंधी नियोजनात पारदर्शकता आणली जाणार आहे. (latest marathi news)

स्मार्ट वॉटर मीटरचे फायदे

- जुने मीटर बदलून तेथे इलेक्ट्रॉनिक प्रो-मीटर.

- इलेक्ट्रॉनिक मीटरच्या माध्यमातून पाणी वापराचे अचूक वाचन.

- पाणीपट्टी कर्मचाऱ्यांच्या मोबाईल ॲपवर मीटरचे रीडिंग.

- वेळ वाचेल व मनुष्यबळ नियुक्त करण्याची आवश्यकता नाही.

- पाण्याच्या अचूक वापराची नोंद.

- जलकुंभातून वितरित होणाऱ्या पाण्याचा हिशोब.

- एका विशिष्ट लेव्हलला पाणी आल्यानंतर ओव्हरफ्लो बंद.

- जलकुंभातून कोणत्या भागात किती पाणी गेले याचा हिशोब.

- जलकुंभावरील यंत्रणा कंट्रोल कमांड सेंटरला जोडणार.

- मीटरचा डेटा कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटरकडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT