Nashik Water Shortage  esakal
नाशिक

Nashik Water Shortage : जिल्ह्यातील 7 धरणे कोरडीठाक! 31 जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात आतापर्यंत ६८.५ मिलिमीटर पाऊस झालेला असला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने सात धरणे कोरडीठाक पडली आहेत. आठ धरणांमध्ये तब्बल पाच टक्क्यांपेक्षा कमी साठा राहिल्याने पाणीकपातीचे संकट वाढले. ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (7 dams in district are dry)

जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत पुरविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले असले, तरी साठा खूपच खालावला आहे. उपलब्ध पाणीसाठा आठ टक्क्यांच्या खाली सरकल्याने ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे ढग दाटले आहेत. त्यातही आठ धरणांत पाच टक्क्यांपेक्षा कमी साठा असून, सात धरणे पूर्णत: कोरडी झाली आहेत.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यंदा उन्हानेही जिल्हावासीयांना घाम फोडला. कधी नव्हे, ते ४२ अंश सेल्सियसच्या जवळपास कमाल तापमान पोहोचले. ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत आटल्याने टँकरद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्यावरच गेल्या काही महिन्यांपासून भिस्त आहे. जिल्ह्यात सुमारे ४०० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, धरणांमधील उपयुक्त साठा दिवसागणिक तळाकडे चालला.

जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची एकूण २४ धरणे आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट एवढी आहे. सद्यस्थितीत पाच हजार २८३ दशलक्ष घनफूट म्हणजेच जवळपास निम्माच साठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत म्हणजेच दीड महिना पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. (latest marathi news)

या धरणांचा साठा संपला

ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भावली, भोजापूर, नागासाक्या, माणिकपुंज ही धरणे कधीच कोरडीठाक पडली आहेत; तर आळंदी, करंजवण, वाघाड, मुकणे, वालदेवी, चणकापूर, हरणबारी, पुनद या धरणांचा साठा पाच टक्क्यांच्या आत आल्याने या धरणांमध्ये नावापुरतेच पाणी शिल्लक आहे.

‘गंगापूर’मध्ये मात्र पुरेसे पाणी

शहरवासीयांना पाणी पुरविणाऱ्या गंगापूर धरणात आजमितीस १८.५८ टक्के साठा आहे. मुकणे धरणातील साठा मात्र आठवडाभरात ३.८ टक्क्यांवर आला. सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या गिरणा धरणात १२.१८ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

धरणनिहाय साठा

धरण.........................उपलब्ध साठा

गंगापूर........................१८.५८

कश्यपी......................२३.२७

गौतमी गोदावरी---..........१०.३३

आळंदी.........................१.४७

पालखेड.......................२०.५२

करंजवण......................१.८२

वाघाड..........................३.००

दारणा...........................३.६६

मुकणे............................३.०८

कडवा............................६.६९

चणकापूर........................४.५७

हरणबारी.........................७.८०

केळझर...........................०.५२

गिरणा............................१२.१८

वालदेवी.......................००

भावली...........................००

भोजापूर..........................००

नागासाक्या......................००

ओझरखेड.....................००

पुणेगाव.........................००

तिसगाव.......................००

पुनंद...........................००

माणिकपुंज.....................००

---------------

सरासरी.............................८.०५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT