Burst of new pipeline of Sola village water supply scheme. esakal
नाशिक

Nashik Water Scarcity: 6 महिन्यांतच फुटली 20 कोटींची जलवाहिनी! कांदानगरी लासलगावसह 16 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई

Nashik News : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : वीस कोटी रुपये खर्च करून केलेली नवीन जलवाहिनी अन जुनी जलवाहिनीही फुटल्याने लासलगावसह इतर १६ गावांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठीही दोन-तीन दिवसांची वाट बघावी लागत आहे. (Nashik Water Scarcity Severe shortage Lasalgaon marathi news)

लासलगावसह १६ गाव पाणी पुरवठा योजनेच्या सततच्या पाइपलाइन फुटणे, वीज पुरवठा तोडणे या कारणांमुळे नांदुरमध्यमेश्वर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही लासलगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महिन्यातून तीन ते चार वेळा गावाला पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

नवीन पाइपलाइनसाठी २० कोटी रुपये खर्च करून योजना सहा महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात सुरू झाली खरी, मात्र पुन्हा नवीन आणि जुनी पाइपलाइन फुटल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. या सततच्या लिकेजमुळे पाणीपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.

या भीषण पाणी टंचाईने लासलगाव परिसरात टँकर, खासगी बोअरवेल, महिलांच्या डोक्यावर हांडे या प्रकारचे चित्र आता सर्वत्र बघावयास मिळत आहे. प्रशासनाने यात वेळीच गांभीर्याने लक्ष घालून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

सुटता सुटेना पाणी समस्येचे ग्रहण

सध्या लासलगावला कोणत्या ना कोणत्या कारणाने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांनी पगारासाठी केलेले कामबंद आंदोलन, थकीत वीज बिलापोटी खंडित केलेला वीजपुरवठा, नवीन केलेली पाइपलाइन अनेक ठिकाणी गळती या कारणांनी लासलगावकरांना तीव्र पाणीटंचाई सोसावी लागत आहे.

यामुळे अनेक व्यावसायिक लासलगावमधील व्यवसाय दुसरीकडे घेऊन जात आहेत. माहेरी जायची वाट बघणाऱ्या माहेरवाशीनींना पाणीटंचाईमुळे जाता येत नाही, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने बालगोपाल पाणीटंचाईमुळे मामाच्या गावाला येऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.

"लासलगाव शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या नवीन नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही, त्यातच सोळागाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी मंजूर केलेले पैसे नेमके कोणाच्या घशात जात आहे, याचा खऱ्या अर्थाने शोध लावला पाहिजे. सोळागाव योजना नादुरुस्त झाल्यावर अनेकांना दुरुस्तीच्या नावाखाली पैसे उकळता येतात. शहराला भेडसावणारी पाणीटंचाई ही मानवनिर्मित कृत्रिम पाणीटंचाई असून येणाऱ्या सर्वच निवडणुकांमधून जनतेने या भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे."-सचिन होळकर, सरचिटणीस, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्रच नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

SCROLL FOR NEXT