Water Tanker (file photo) esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : जिल्ह्यात भीषण टंचाई! टॅंकरची संख्या 400, खर्च 63 कोटी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. मेअखेर टॅंकरची संख्याही ४०० वर पोचली आहे. मॉन्सून वेळेत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, मॉन्सून वेळेत दाखल न झाल्यास टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर आतापर्यंत तब्बल ६३ कोटींचा खर्च झाला आहे. शासनाकडून टंचाईसाठी निधी प्राप्त झालेला नाही. (Severe water shortage in Nashik district)

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेकडो गावे व वस्त्यांमधील सात लाखांवरील म्हणजे २० टक्के नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी सरकारने आतापर्यंत ६३ कोटी रुपये खर्च केले आहेत. या विभागांच्या पाणीयोजनांचे जलस्त्रोत कोरडे पडल्यामुळे तेथेही टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढावली आहे.

जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस झाला असल्याने पर्जन्यछायेच्या तालुक्यांमध्ये अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३५ लाख असून, त्यापैकी सात लाखांवर म्हणजे २० टक्के लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

यात टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी विहीर अधिग्रहण व टँकर वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या जुलैपासून आतापर्यंत या टँकर व विहीर अधिग्रहणासाठी ६३ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यातील केवळ आठ लाखांची देयके टँकरचालकांना देण्यात आली असून, ५५ कोटींची देयके प्रलंबित आहेत. या देयकांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे. (latest marathi news)

टॅंकर ४०० वर, धरणांनीही गाठला तळ

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणात थोडाच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. ग्रामीण भागातही दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३६० गावे आणि ९३७ वाड्या अशा एकूण एक हजार २९७ गाव-वाड्यांना ३९० टँकरच्या ८७१ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात १४ शासकीय आणि ३७६ खासगी टँकरचा समावेश आहे. या टॅकरद्वारे सहा लाख ७६ हजार ९५४ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

टँकर भरण्यासाठी आतापर्यंत तब्बल २०४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात गावांसाठी ६३, तर टँकरसाठी १३५ विहिरींचा समावेश आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जिल्ह्यासाठी केवळ दोन टँकर पुरवठादार

जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून दोनच पुरवठादार असून, ते पुरवठादार जिल्ह्याच्या पूर्व भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करतात. या वर्षी पश्चिम भागातील अधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण या तालुक्यांमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तालुकानिहाय टँकरद्वारे पाणी पुरवण्याचा खर्च

नाशिक : १०.८० लाख , चांदवड : ४.१० कोटी, नांदगाव : ३२.१९ कोटी, बागलाण : ३.२८ कोटी, देवळा ः १३.८८ कोटी, मालेगाव : ४.४८ कोटी, येवला : ४.५३ कोटी, सिन्नर : १.३० कोटी. एकूण : ६२.८९ कोटी.

तालुकानिहाय सुरू असलेले टॅंकर

बागलाण (४२), चांदवड (३३), देवळा (३१), इगतपुरी (१६), मालेगाव (४९), नांदगाव (७७), नाशिक (१), पेठ (१६), सुरगाणा (१८), सिन्नर (४६), त्र्यंबकेश्वर (४), येवला (५८).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT