Dead stock remaining in the Waghdardi dam that supplies water to the city. esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : वागदर्डी धरणाने गाठला तळ; पाणीपुरवठ्याचा बसेना मेळ!

Nashik Water Scarcity : मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून, केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा

मनमाड : मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून, केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. पाणीच नसल्याने पालिकेतर्फे महिन्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात असून, मनमाड शहरावरील घोंगवणारे पाणी संकट पाहता पालखेड धरणातून हंगामाचे शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. (Nashik Water Scarcity water level in Wagdardi Dam is very low)

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अथवा शहर परिसरात मागीलवर्षी दमदार पाऊस झाला नसल्याने धरण कोरडेठाक राहिले. सव्वालाख लोकसंख्या असलेल्या शहराला पाणी आणावे कुठून, असा प्रश्‍न पालिकेला पडला आहे. वागदर्डी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस झाला नसल्याने धरणात पावसाचे पाणी आले नाही.

त्यामुळे सर्व मदार पालखेड धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर होती. डिसेंबरमध्ये मिळालेल्या आवर्तनाच्या पाण्यातून पालिकेने शहरात महिन्यातून एकवेळा पाणीपुरवठा केला. मात्र, आता तर धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाणीसंकट उभे राहिले आहे.

पाटोदा येथील साठवण तलावाही कोरडाठाक पडला आहे. पाहिजे तितका पाऊस न पडल्याने भूजल पातळीही खालावली आहे. शहरातील बोअरवेल, विहिरींनी तळ गाठला आहे. (latest marathi news)

गढूळ पाणीपुरवठा डोकेदुखी

पालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे पाणी गढूळ येत आहे. सदर पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, यासाठी पाण्याचे नमुने तपासले असून, पिण्याच्या पाण्याची कुठलीही गुणवत्ता कमी झालेली नसल्याचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी सांगितले. मात्र, दुषित पाण्याच्या भितीने अनेकांनी जारला पसंती दिली आहे.

पालखेडचे आवर्तन सोडण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी पालखेडचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. सदर पाणी तीन दिवसांनी अर्थात ७२ तासांनी पाटोदा तलावात पोहचणार आहे.

"आवर्तनाच्या पाण्यातून आतापर्यंत शहराला पाणीपुरवठा केला गेला. धरणात सध्या मृतसाठा शिल्लक आहे. शहरावरील पाणीटंचाई पाहता पालखेड धरणातून आवर्तन सोडण्यात आले असून, २९ तारखेला पाणी पाटोदा तलावात पोहचणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळावा. पुढील तीन महिने पाणी पुरवावे लागणार आहे."- शेषराव चौधरी, मुख्याधिकारी, मनमाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT