Water Tanker  esakal
नाशिक

Nashik Water Shortage : ऐन पावसाळ्यात 765 गावांची 199 टॅंकरवर भिस्त; तहान भागविण्यासाठी टँकरच्या 474 फेऱ्या

Water Shortage : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी अनेक गावे व वस्त्यांची भिस्त आजही टॅंकरवरच आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Shortage : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी अनेक गावे व वस्त्यांची भिस्त आजही टॅंकरवरच आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची शासनाने दिलेली ३० जूनची मुदत संपुष्टात आल्याने राज्य सरकारने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ही मुदत ३१ जुलैपर्यंत राहणार आहे. (765 villages on 199 tankers due to delay rain )

सद्यःस्थितीत जिल्ह्यात १९९ गावे व ५६६ वाड्यांना १९९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी सरासरीहून कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर या उन्हाळ्यापर्यंत आणि आता पावसाळ्यातही सुरूच आहेत. यंदा दुष्काळाची तीव्रता मोठी असल्याने टॅंकरची संख्या ४०० वर पोचली होती. ७ जूनला जिल्ह्यात ३६२ गावे आणि ९४१ वाड्या अशा एक हजार ३०३ ठिकाणी ३९८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता.

जिल्ह्यातील सात लाख १६ हजार ५०१ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून होते. साधारणः जूनमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले, की जूनअखेर टँकर बंद होणे प्रशासनाला अपेक्षित होते. जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले खरे. विशेष म्हणजे दुष्काळी भाग असलेल्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरीही लावली. या पावसामुळे टॅंकरची संख्या घटली आहे. मात्र, सर्वव्यापी पावसाने जिल्हाभरात हजेरी लावलेली नाही. (latest marathi news)

पश्चिम भागातील तालुक्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पुरेसा पाऊस नसल्याने जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात १९९ टँकरद्वारे ७६५ ठिकाणी चार लाख नऊ हजार ९४९ व्यक्तींना पाणीपुरवठा करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून ३० जूनपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला परवानगी दिली होती. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही पुरेसे पर्जन्यमान नसल्याने टँकरला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

त्यामुळे स्थानिक पातळीवर पाण्याची उपलब्धता होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात येणार आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात १४८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात बागलाण (३१) व मालेगाव (४१) तालुक्यात सर्वाधिक विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय सुरू असलेले टॅंकर

नांदगाव (३६), येवला (३५), मालेगाव (३३), सिन्नर (२५), बागलाण (२९), देवळा (१७), चांदवड (२३), पेठ (१) दिंडोरी, कळवण, निफाड, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील टॅंकर बंद झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT