water  esakal
नाशिक

Nashik Water Shortage : नवीन जलकुंभाच्या निर्मितीनंतरही पाणीटंचाई कायम; पंचवटीत अनेक भागात हंडाभर पाण्यासाठी वणवण

Water Shortage : शहरातील पंचवटीतील अनेक भागात हंडाभर पाण्यासाठी महिला वर्गाची वणवण सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Shortage : शहरातील पंचवटीतील अनेक भागात हंडाभर पाण्यासाठी महिला वर्गाची वणवण सुरू आहे. ज्यांच्याकडे विद्युत मोटारी आहेत, त्यांच्याकडे धोधो तर ज्यांच्याकडे मोटारी नाहीत, त्यांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या भागात पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलकुंभ देखील तयार करण्यात आला आहे. मात्र असे असतानाही परिसरातील पाणीटंचाई कायम आहे. (Water shortage continues even after construction of new water reservoir )

त्यामुळे एकवेळ का होईना योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, वाढत्या विद्युत मोटारींच्या वापराला पायबंद घालावा, अशी मागणी पंचवटीतील नागरिक करत आहे. पंचवटी विभागातील गणेशवाडी, सहजीवन नगर, शेरी मळा, हिरावाडी रोड हा गावठाण भाग आहे. दोन वेळेस पाणी येत असल्याने बहुसंख्य नागरिकांना पाणी साठविण्याची व्यवस्था केलेली नाही. परंतु या भागात नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने विद्युत मोटारींचा वापर वाढला आहे.

सायंकाळी मोटरींचा वापर अधिक होत असल्याने अनेकांना पाण्यापासून मुकावे लागत आहे. त्यामुळे पाण्यासाठी भल्या पहाटेपासून येथील रहिवासीयांची धावपळ सुरू होते. याबाबत वारंवार निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठ्याच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर नळाला योग्य दाबाने पाणी येत असल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला. (latest marathi news)

वाढीव पाण्यासाठी पत्र : नरेश शिंदे

पंचवटीतील अनेक भागात सावरकर नगर भागातील जलकुंभातून पाणीपुरवठा होतो. याठिकाणी तीन जलकुंभ आहेत, परंतु सध्या त्यातील दोनच टाक्यांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. तिसऱ्या टाकीतून पाणीपुरवठ्यासाठी संबंधितांना पत्र दिले आहे. त्यावर कार्यवाही झाल्यावर येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल. तूर्त वाढत्या विद्युत मोटारींच्या वापरावर निर्बंधासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती विभागीय पाणीपुरवठा अधिकारी नरेश शिंदे यांनी दिली. सध्या गंगापूर धरणातच अल्प पाणीसाठा असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून ते जपून वापरण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.

''मुंजोबा चौक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पहिल्या थेंबापासून शेवटच्या थेंबापर्यंत वाट पाहावी लागते, घरातील नळाला पाणीच येत नसल्याने दूरवरून पाणी आणावे लागते.''- सुनील सूर्यवंशी

''अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी कसे पुरवावे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेने एकवेळ तर व्यवस्थित दाबाने पाणीपुरवठा करावा.''- गायत्री ताजणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT