A dried-up vessel of Devnadi in the taluk esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : देवनदी पात्र कोरडेठाक; सिन्नर तालुक्यात पाणीटंचाईचे सावट

Nashik News : तालुक्यातून वाहणाऱ्या देवनदीचे पात्र व नदीवरील बंधारे सध्या कोरडेठाक पडले आहे. संपूर्ण पावसाळ्यात तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यातून वाहणाऱ्या देवनदीचे पात्र व नदीवरील बंधारे सध्या कोरडेठाक पडले आहे. संपूर्ण पावसाळ्यात तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. अनेक गावांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. (Water shortage in Sinnar taluka)

तालुक्यातील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. नदीपात्रातही ठणठणाट आहे. नदीवरील बंधाऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिके सध्या धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पिके करपून गेली आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. सध्या नदीकाठच्या अनेक गावांमध्ये शासनाद्वारे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जनावरांना व माणसांना पाण्याच्या टँकरमुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात यावर उपाय शोधून नदीपात्रातील बंधाऱ्यांमध्ये वर्षभर पाणीसाठा राहील, याचे नियोजन करावे, अशी मागणी अनेक नागरिक करीत आहेत. उन्हाळा सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तालुक्यातील अनेक मोठ्या गावांना हीच परिस्थिती आहे.

अनेक गावांना तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील अनेक नद्यांचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सध्या काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात उग्र रुप धारण करीत असल्याचे शेतकरी गोवर्धन रानडे, ज्ञानेश्‍वर गडाख, म्हाळू खोले, सागर गिते यांनी सांगितले. (latest marathi news)

विहिरी, पाझरतलावांचे जलस्रोत आटले

सध्याच्या कडक उन्हामुळे ग्रामीण भागातील विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. नद्या-नाले, पाझर तलाव, सिमेंट बंधारे व गावतळे पाण्याअभावी कोरडेठाक आहेत. तालुक्यातील अनेक गावांतील जलस्त्रोत आटल्याने गावांना दररोज टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विविध गावांतील वाड्या-वस्त्यांवर टॅँकर सुरू करण्यात आले आहे.

"लोकसंख्येनुसार टॅँकरच्या फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गाव व वाड्या-वस्त्यांवरील टॅँकर मागणीसाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. कोणत्याही गावांचे किंवा वाड्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आल्यास तातडीने प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले जातात." - सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, सिन्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT